- माझा कोण आहे । कोण माझा नाही ।
- कळेचना काही । मज आता ।।
- जवळचे सारे । म्हणायला फक्त ।
- प्राशणारे रक्त । आहे मात्र ।।
- सज्जन म्हणून । कोणास स्मरावे ।
- कोणास करावे । आपलेसे? ।।
- दावतात जसे । कोण वागतात? ।
- फायदा घेतात । करुनिया ।।
- याचमुळे माझा । बसेना विश्वास ।
- आता आहे दास । जननीचा ।।
- जननीच माझी । आहे उद्धारक ।
- फारच प्रेरक । मूर्ती तिची ।।
- म्हणुनी मजला । आईस पुजने ।
- जगास पाहणे । तिच्या नेत्री ।।
- अजु दास गातो । आईचे भजन ।
- मनन,पठन । फक्त तिचे ।।
- शब्दसखा
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी,ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७