• Mon. Sep 25th, 2023

९0 कोरोना पॉझिटिव्ह, ४११ रुग्णांचा मृत्यू

ByGaurav Prakashan

Jan 22, 2021

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला जिल्ह्य़ात सुरुवात झाली असतानादेखील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढत होत असल्याचे दिसून येत आहे.
२१ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्य़ात ९0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी २0 हजार ९९५ रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. ४११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४00 च्या जवळपास रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून २0 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्य़ात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनासह नागरिक सुध्दा त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपासून जिल्हयात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली ही जिल्हावासीयांसाठी शुभवार्ता असली तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सातत्याने वाढत असलेली संख्या ही नागरिकांसाठी चिंतनीय बाब आहे.
प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून सातत्याने उल्लंधन होत असल्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. २१ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्य़ात ९0 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असुन जिल्हयात आतापर्यत २0 हजार ९९५ रुग्ण आढळून आले आहेत. ४00 च्या जवळपास रूग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून २0 हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!