• Thu. Sep 28th, 2023

हिलिंग ईज ब्युटीफुल : जून चित्रपटाचे दिग्दर्शक

ByGaurav Prakashan

Jan 21, 2021

मुंबई (पीआयबी) : “हिलिंग ईज ब्युटीफुल. जर तुमच्या मनाचा एखादा कोपरा खचलेला असेल, एखादा असा भाग आहे जो बरा झाला पाहिजे तर ती प्रक्रिया सुरु होईल. मोकळे व्हा आणि संभाषण करा. आम्ही आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हेच दाखवू इच्छितो.” गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरामा विभागात प्रदर्शित केलेल्या जून या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी हा संदेश दिला आहे. आज, 20 जानेवारी 2021 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संभाषणांच्या आवश्यकतेविषयी बोलताना, दिग्दर्शक गोडबोले म्हणाले: “दोन व्यक्तींमधील संपर्क असणे आवश्यक आहे. आमचा चित्रपट पुन्हा संभाषण करणाऱ्या लोकांबद्दल भाष्य करतो. बऱ्याचदा आपल्याला कोणाशी बोलायचे, आपल्या भावना कोणासोबत सामायिक करायचे हे माहित नसते. आजच्या या युगात प्रत्येक व्यक्ती हे एक बेट झाले आहे, आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात कोणाचीतरी आवश्यकता आहे. आजची पिढी आणि परीस्थीतीशी साधर्म्य दाखवणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”
‘हिलिंग इज ब्युटीफुल’ या चित्रपटाच्या टॅगलाईन विषयी गोडबोले म्हणाले की, यामध्ये बरेच दृष्टीकोन आहेत. “आम्हाला मदत आणि उपचार शोधण्याची गरज आहे, बर्‍याचदा आपण स्वतःच्याच प्रेमात आणि विध्वंसात हरवून जातो. आपण आपल्यातील अपराधी भावना दूर करण्यास आणि आपल्या आतील राक्षसाचा अंत करून बरे होण्याची प्रक्रिया सुरु करण्यास कधीच घाबरू नये. यामुळे तुम्हाला बरे वाटेल. परंतु आपणास ही प्रक्रिया सुरु व्हावी द्यावी लागेल. ”
चित्रपटाचे दुसरे दिग्दर्शक वैभव खिस्ती म्हणाले: “जूनमध्ये आम्ही अनेक विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. ”प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्य अभिनेता सिद्धार्थ मेनन म्हणाले, “प्रत्येक सेकंद आनंद देणारा आहे आणि आव्हानात्मक भूमिका करायला मला आवडते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!