हिंगणघाट : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दातार) शिवारात आठ मोर मृतावस्थेत आढळलेत. बुधवारी ही घटना निदर्शनास आली. राष्ट्रीय पक्षी अशा पद्धतीने अचानकपणे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली. मोरांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला की इतर कोणते कारण आहे, हे परीक्षण अहवालानंतर स्पष्ट होईल.
बोरगाव शिवारात मोर मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या चमूने तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकार्यांना बोलावण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी घटनास्थळी मृत मोरांची पाहणी केली. मृत मोरांपैकी काही पक्ष्यांचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहेत. तपासणीनंतर मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या बर्ड फ्लूची साथ सुरू आहे. अशात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. वनविभागाच्या वतीने पुढील कारवाई केली जात आहे.
पीपीई किट घालून पशुसंवर्धन अधिकार्यांकडून बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी नमुने गोळा करण्यात आले.
हिंगणघाट तालुक्यात आठ मोरांचा मृत्यू
Contents hide