वरुड : पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांचे कुटुंबियास तात्काळ आर्थिक मदत देवुन मयताचे पत्नीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली .
पोलीस शिपाई हर्षल लेकुरवाळे यांनी दि.१९.१२.२०२० रोजी स्वतःचे पोलीस क्वार्टर मध्ये सहा.सब इन्सपेक्टर सुधिर बघेल.नाईक पो.कॉ.मनिष मोरे व हे.कॉ.राजेश चंदेल यांचे त्रासाला कंटाळुन गळफास घेवुन फाशी घेतली. त्यावेळेस पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे हे कर्तव्यावर कार्यरत होते तसेच वरिष्ठांचे त्रासाला कंटाळुन पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांनी आत्महत्या केली .
पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांचे पश्चात त्यांची पत्नी व नुकतेच जन्मलेले दिड महिण्याचा मुलगा व अपंग वडील असे सामाईक कुटुंब असून पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उघडयावर पडलेले असुन त्यांचेवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांचे घरात दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसुन पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे हा घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असल्यामुळे पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांच्या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांचे कुटुबियांना त्वरीत शासकीय आर्थिक मदत मिळण्यात यावी. व मयताची पत्नी ही निराधार झाल्यामुळे तिला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच हर्षलच्या घरात सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी ती नोट जप्त केली असून. त्यात त्याला त्याच्या सिनियरकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख असल्यामुळे आत्महत्या करण्याची हर्षलवर वेळ आणणारे दोषी पोलीस कोण याचा शोध घेणे महत्वाचे आहे . पोलीस शिपाई हर्षल लेकुरवाळे यांचे मृत्युला बरेच दिवस उलटुन सुध्दा दोषी अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कसलेही प्रकारची कार्यवाही झाली नसल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलीस शिपाई हर्षल लेकुरवाळे यांचे मृत्युची सखोल तपासणी करुन दोषींना शिक्षा देण्यात यावी व पोलीस शिपाई हर्षल लेकुरवाळे यांचे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे अधिकाऱ्यांवर त्वरीत निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस महासंचालक यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
हर्षल लेकुरवाळेच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा – आमदार देवेंद्र भुयार
Contents hide