• Thu. Sep 28th, 2023

हरवलेले पाखरे……

ByGaurav Prakashan

Jan 23, 2021
    हरवलेल्या पाखरांच्या आईचे
    चेहरे अजून डबडबलेले
    नाजूक कोमल कांतीला
    आगीने पूर्ण लपटलेले…..
    घडणाऱ्या घटनेनंतर
    यंत्रणा लागली कामाले
    पहिलेचं घेतली असती काळजी
    तर भविष्य नसते जळले…..
    मदतीचे सारे ओघ येऊन
    काय ममतेला न्याय मिळेल.
    आपण पुन्हा विसरू
    आणि असेच पुन्हा घडेल….
    गयवरली सारी नगरी
    मनं सारे भेदरलेले
    अंकुरणाऱ्या जीवांचे
    कसे विसरावे आर्त किंकाळणे..

-संदीप गायकवाड

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    ९६३७३५७४००