• Sun. Jun 11th, 2023

स्मशानभूमीचे छत कोसळून २१ ठार

ByBlog

Jan 4, 2021

गाजियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुरादनगर स्मशानभूमी परिसरातील एका ठिकाणचे छत कोसळल्याने त्या खाली दबून २१ जणांचा मृत्यू आणि २0 जण जखमी झाले. अनेकजण ढिगार्‍याखाली दबल्या गेले असून, बचावकार्य सुरू आहे. आतापयर्ंत ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, या दुर्घटनेसाठी जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे विभागीय आयुक्त अनिता मेर्शाम यांनी सांगितले आहे.
अत्यसंस्कारसाठी आलेले लोकं पाऊस आल्याने एका छताखाली उभा राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळले व ते सर्वजण त्याखाली दबल्या गेले. घटनेची माहिती मिळाताच पोलिस व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झाले.
या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मी जिल्हा अधिकार्‍यांना मदतकार्य राबवण्याच्या व घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनेतील पीडित व्यक्तींना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *