• Mon. Jun 5th, 2023

स्मरणशक्तीसंबंधी समस्या.?

ByBlog

Jan 4, 2021

वय वाढलं की अनेकांची स्मरणशक्ती कमी होते तर काही दीर्घायुषी शेवटच्या क्षणापर्यंत भूतकाळातील सर्व घटना तारखेनशी सांगू शकतात. यावरुन ही शक्ती टिकवणं आपल्या हातात आहे हे समजू शकतं. पण याकडे दुर्लक्ष केल्यास अथवा अन्य कुठल्या कारणांमुळे विस्मरणाची गंभीर समस्या उद्भवते. धोक्याची बाब म्हणजे स्मरणशक्तीसंबंधी समस्या असणार्‍यांना भविष्यात स्ट्रोकचा धोका जाणवू शकतो. त्यातही उच्चशिक्षित लोकांना विस्मरण होत असेल तर स्ट्रोकची शक्यता अनेक पटींनी वाढत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. नेदरलॅंडमधल्या इरॅमस विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी स्मरणशक्ती आणि स्ट्रोक यांच्यातल्या संबंधांबाबत संशोधन केल्यानंतर समोर आलेली ही बाब आहे. नेदरलॅण्डमधल्या ५५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या एकूण ९१00 लोकांना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आलं होतं. त्यापैकी ११00 लोकांना स्ट्रोक उद्भवला.
उच्चशिक्षित व्यक्तींना स्मरणशक्तीसंबंधी तक्रारी असतील तर स्ट्रोकचा धोका ३९ टक्क्यांनी वाढत असल्याचं समोर आलं आहे. उच्च, मध्यम आणि कमी शिक्षित अशा तीन वर्गातील लोकांना या संशोधनासाठी निवडण्यात आलं होतं.
स्ट्रोकमुळे निर्माण होणार्‍या स्मरणशक्तीच्या तक्रारी तिन्ही गटांपैकी उच्चशिक्षित लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आल्या. त्यामुळेच उच्चशिक्षित असाल तर स्मरणशक्तीबाबतच्या छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *