• Thu. Sep 28th, 2023

स्त्री मनाची दशा आणि दिशा

ByGaurav Prakashan

Jan 18, 2021
  स्त्री जन्मा अजब तेरी काहाणी
  सिने मै है दुध और आँखो मै है पाणी
  नमस्कार सर्व सख्यांनो
  सखे !

आपण आजबाजूला पाहतो तर काय दिसते ग .. एक स्त्री आपल्या परिवारासाठी रात्रदिनं झटत असते..हे तिचे खपणे, रोजची तारेवरची कसरत, घरात कोणालाही दिसून येत असली तरी त्यावर कानाडोळा नक्कीच केला जातो..
घरातील खर्चाचे दैनंदिन रोज निशी मांडताना तिला कधी विचारात घेतले जात नाही. आज कोरोनाच्या लाँकडाऊन मध्ये सगळे भयभीत झाले असतील तरी ती सक्षम पणे तटस्थ राहुन घरातील प्रत्येक सदस्यावर लक्ष ठेवून असते.तिला कशाचे लाँकडाऊन नाही . सारखे काम आणि सर्वाची फर्माईश, नवी डिश तयार करण्यासाठी उडालेली तारांबळ..
मुलगा बाहेर गेला .तर कशासाठी गेला.घरीआल्यावर त्यांने हात पाय स्वंच्छ धूतले किंवा नाही हे जातीने पाहणारी आईच आहे. रोजच्या आहारातून परीवार कसा फिट राहील यांचाच ती सारखा विचार करत असते.त्यामुळे घरातील आरोग्य चांगले राहते
तरी तिला नजरेआड केले जाते का तर ती बाई आहे.
तिला काय महत्व द्यायचे…
हे शहरी भागातही आहे ..
काही ठिकाणी शिक्षणाने काही प्रमाणात कमी असेल पण खेड्या भागात तर खूपच जास्त शोषण आहे….
पण हे किती काळ चालणार आहे..एखाद्या सुंदर बाईला पाहताच ती कशी आहे .तिच्या शरीराचे निरक्षण केल्या जाते नजर तिच्या शरीरावरून तिच्या चेहऱ्यावर येते…
अगदी तिला हे न कळताच सगळे काही चालू असते…
मग या पुरूषी व्यवस्थेला ती बळी पडते ,हे वास्तव असेच दिसते..
अगदी तिने राहावे कसे.दिसावे कसे..यावरही समाज तिला बंधने घालतो…
ती एवढी शिकली सक्षम झाली तरी आपण म्हणू शकतो का.आजची महिला सक्षम झाली..म्हणून ? नाही म्हणू शकत . कारण आज ही तिच्या वाटेवर काटे आहेत .आग, काचा आहेत. ती त्यातुन निघत आहे निघण्याचा प्रयत्न करीत आहे .
पण हया सगळ्या श्रूंखला स्त्रीने फेकून शिक्षणाच्या माध्यमातून तिने स्वताःला व्यक्त केले..हे हक्क आपल्याला आपले जन्मदात्यांनी नाही दिले .सक्षमतेचे आकाशाचे पंख संविधानाच्या रुपाने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिले आहेत.
म्हणुनच डाँ .बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतीबा फूले आणि सावित्रीबाई फूले यांना आपले गुरू मानतात..
चला ..तर मग आपण ही आपले अव्यक्त रूप व्यक्त करू या…
आपण आपली मैत्री चांगली घट्ट करू या..

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  सुनीता इंगळे
  मुर्तिजापूर