शरीर सुदृढ बनवण्यासाठी योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम याचा समतोल पाळणं अत्यंत गरजेचं असतं. त्यातही काही व्यायाम प्रकार विशिष्ट हेतूने केले जातात. उदाहरणार्थ पिळदार शरीर आणि डौलदार मांड्यांसाठी स्क्वॅट हा आसनप्रकार केला जातो. पण हा व्यायाम योग्य प्रकारे केला नाही तर शरीराला त्रास होऊ शकतो. स्क्वॅट करताना काय टाळावं, याबाबत जाणून घेऊ या..
स्क्वॅट करताना सरळ रेषेत खाली बसा. स्क्वॅट करताना शक्य तितकं खाली बसण्याचा प्रयत्न करा. अर्धवट बसून स्क्वॅट करू नका. मांड्या जमिनीशी समांतर असू द्या. स्क्वॅट नीट झालं नाही तर पायांचा विकास नीट होणार नाही. अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.
हा व्यायामप्रकार करताना पाठ फार वाकवू नका. तुमची पाठ ताठ असली पाहिजे. जास्त वाकवल्याने पाठीवर ताण येऊन दुखापत होण्याची शक्यता वाढेल.
स्क्वॅट करताना वर बघू नका. सरळ बघा. यामुळे पाठीवर ताण येणार नाही.
स्क्वॅट करून पुन्हा पूर्वस्थितीत आल्यावर श्वास सोडा. तोपर्यंत श्वास रोखून धरा. यामुळे पाठीच्या खालच्या भागला दुखापत होण्याची शक्यता अनेकपटींनी कमी होईल.
स्क्वॅट करताना हे टाळा..
Contents hide