सोयीसाठी सर्वकाही…!

  सोयीचं सुख आणि दुःख
  सोयीचीच माणसे
  अवतीभवती माझ्या,
  निवडही माझीच
  अडचण ही मलाच,,,
  सोयरे सोयीचेच सारे
  सुख ,दुःख सोयीचेच त्यांचे
  आणि माझेही,
  अकारण दोष देण्यासाठी
  करून ठेवलेली सोयच ती,
  सवयीच्या जगण्याची
  सोय करून ठेवण्यासाठी,
  किती ही धडपड,
  सोयीसाठी,, मन मारून
  माणसे जपतो आम्ही,
  ती पण सोयीचीच,
  अनोळखी प्रदेशात,
  वावरतो आम्ही मनाने
  पण शरीराला सोयीच्या च
  ठिकाणी आणून टेकवतो,शेवटी,
  सोय, सोय, सोय, सोय,
  सर्व ठिकाणी माझी सोय
  कोणीही अनोळखी येऊन
  माझ्या सोयीच्या प्रदेशात,
  जर आक्रमण केले तर,
  माझ्यातला मानवी हक्क
  कार्यकर्ता जिवंत होतो,
  हक्कासाठी लढतो,,माझ्याच,
  शिक्षणाला पूर्णपणे वापरतो मी,
  सोयीसाठी ,सोयी मिळवण्यासाठी
  माझ्या अवतीभवती गोतावळा,
  सोयींचाच माझा,
  सुख आणि दुःख, सोयीचेच माझे
  आणि त्यांचे ही,,,,ते ही माझ्या सोयीने असेल तर,
  निलेश रामभाऊ मोरे
  मु,पो,मनभा ता,कारंजा लाड
  जिल्हा वाशीम 444105