• Thu. Sep 28th, 2023

सेवाभाया….

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021
    तुझ्यात गुंतलो । नाही देहभान ।
    रूप तुझे छान । सेवाभाया ।।
    गोरुकुळी जन्म । घेऊन आलास ।
    उद्धार केलास । समाजाचा ।।
    क्रांतिकारी भाया । समाज रक्षक ।
    शत्रुत वचक । तुझे देवा ।।
    तूच सेवाभाया । गोरुचा नायक ।
    विज्ञान सुचक । भीमासूत ।।
    भूतदया करा । टाळा पशुबळी ।
    तोडू नका कळी । उमलती ।।
    विज्ञान पूजक । श्रेष्ठ सर्वांहून ।
    सेवेत राहून । जगलासी ।।
    अजु स्मरणार । तुज सेवाभाया ।
    आम्हांवर छाया । ठेव तुझी ।।

©️®️शब्दसखा-

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७