Skip to content
बहुजनांना ज्ञानाचे आकाश केले खुले
ज्योतीसमान जळली सावित्रीबाई फुले ॥ धृ॥
मुली शिकाव्या म्हणुनी सोसले अपार कष्ट
जुलमी रूढी परंपरा केल्या समूळ नष्ट
दलितांच्या उद्धारा सर्वस्वही अर्पिले
ज्योतीसमान जळली सावित्रीबाई फुले ॥१॥
बंड करूनी फुंकली नव्या युगाची तुतारी
निस्तेज जीवनाला दिली नवी भरारी
जगण्याला अमुच्या तू नवे रंग रूप दिले
ज्योतीसमान जळली सावित्रीबाई फुले ॥२॥
शिव्या, दगडमाती,अपमान तू झेलले
आव्हान विषमतेचे सहजतेने पेलले
झेंडा समानतेचाआज डौलाने डुले
ज्योतीसमान जळली सावित्रीबाई फुले॥३॥
ज्योतिबांना दिली साथ पावलोपावली
शोषितांची वंचितांची झालीस माऊली
धडे आम्हाला तूच नवक्रांतिचे दिले
ज्योतीसमान जळली सावित्रीबाई फुले ॥४॥
Post Views: 13
Like this:
Like Loading...