सध्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ होते आहे. गूगलवर कस्टमर केअर नंबरचा शोध घेत असाल तर थोडं सावध व्हा. कारण सर्चमध्ये बनावट कस्टमर केअर नंबरही असू शकतो. या क्रमांकावर फोन केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. बनावट कस्टमर केअरचे प्रतिनिधी तुम्हाला काही अँप्स डाउनलोड करायला सांगू शकतात. ही रिमोट अँक्सेस अँप्स असतात. या माध्यमातून तुमच्या स्क्रिनवर समोरची व्यक्ती नियंत्रण ठेऊ शकते. त्यामुळे कोणत्याही कस्टमर केअरशी संपर्क केल्यानंतर ‘टीम व्यूवर क्वीक सपोर्ट, ‘मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप’, ‘एनी डेस्क रिमोट कंट्रोल’, ‘एअर ड्रॉइड रिमोट अँक्सेस अँड फाईल’,’क्रोम रिमोट डेस्कटॉप’, ‘स्प्लॅशशॉट पर्सनल रिमोट डेस्कटॉप’ अशी अँप्स डाउनलोड करायला सांगण्यात आली तर ती अजिबात करू नका. ही अँप्स वाईट नाहीत. पण त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी.
सावध राहायला हवे!
Contents hide