नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचे संकट असताना भारतात पक्षांच्या तीव्र गतीने होणार्या मृत्युमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून जंगली पक्षी, कावळे आणि कोंबड्यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करण्यात येत आहे. बर्ड फ्लू रोखण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक अधिकार्यांसोबत समन्वय अधिक तीव्र केला आहे. पशुपालन आणि डेअरी विभागाने संभाव्य हॉटस्पॉटवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आतापयर्ंत ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि गुजरातचा समावेश आहे.
दरम्यान, दिल्ली, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या राज्यांमध्ये बर्ड फ्लू आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता जसोला येथे गेल्या तीन दिवसांमध्ये कमीतकमी २४ कावळे आणि संजय सरोवरात १0 बदके मृतावस्थेत आढळली आहेत.
(Image Crdit:India Today)
सात राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग
Contents hide