• Mon. Sep 25th, 2023

समस्या हातापायातील गोळ्याची

ByGaurav Prakashan

Jan 23, 2021

शरीराच्या विविध भागांमध्ये क्रॅम्प अर्थात गोळे येण्याचे प्रमाण जास्त असेल तर ते विशिष्ट पोषक घटकांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी काही बाबी लक्षात घ्याव्या.
* डिहायड्रेशन हे गोळे येण्याचे महत्त्वाचे कारण आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की गोळे येतात. त्यामुळे पाणी, नारळपाणी, फळांचे रस याच्या सेवनाला प्राधान्य द्यावे. वरचेवर पाणी प्यावे.
* केळे हा पोटेशियमचा प्रमुख स्रोत आहे. कबरेदकांचे विघटन करून स्नायू बळकट करण्याचे काम या घटकामुळे होते. मज्जासंस्था तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पोटेशियम गरजेचे असते. मॅग्नेशियम आणि कॅल्शियममुळेही ही समस्या कमी होते.
* रताळ्यातही कॅल्शियम, पोटेशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. विशेष म्हणजे यात केळापेक्षा सहा पटींनी जास्त कॅल्शियम असते. बटाटा तसेच भोपळ्यातूनही हे घटक मिळतात. यासोबत त्यात भरपूर प्रमाणात पाणीही असते. त्यामुळे पाण्याची गरज भागते.
* प्रथिने आणि मॅग्नेशियमसाठी डाळी तसेच बीन्सचे सेवन करावे. यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. फायबरमुळे मासिक पाळीदरम्यान येणार्‍या क्रॅम्प्सची समस्या कमी होते. यामुळे रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे तसेच कोलेस्टेरॉल कमी करणेही शक्य होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!