- सव्वीस तारीख/ जानेवारी मास /
- गणराज्य दिस/ आनंदाचा//१//
- अंमलात आले/संविधान आज/
- सजला हा साज /भारतात//२//
- भीम लेखणीने/स्वातंत्र्य समता/
- न्याय नि बंधुता/घटनेत//३//
- संविधान हाच /सर्वोच्च कायदा/
- सर्वांचा फायदा/भारतात//४//
- जगी भारतात/बहु विविधता/
- जपते एकता/संविधान//५//
- संस्कृती सन्मान/वंचित संतोष/
- करु जयघोष/संविधान//६//
- संविधान रक्षा/करुनिया सारे/
- आनंदाचे वारे/चोहिकडे//७//
- गणराज्य दिन/थोरांची ही देण/
- करु या स्मरण /विभुतींचे//८//
- राज्यघटनेचे/एक शिल्पकार/
- डाँ. आंबेडकर /भारतात//९//
- बाबासाहेबांना/करितो नमन/
- करांनी वंदन/ कोटी कोटी//१०//
-प्रा. अरुण बा. बुंदेले,
Contents hide
- अमरावती.