• Mon. Jun 5th, 2023

संवादातील दरी वाढते आहे..!

ByBlog

Jan 7, 2021
  संवादातील दरी वाढते आहे…!

माणूस हा समुहा मध्ये राहणार प्राणी आहे. त्याला एकोपा आवडत नाही. तो सुरुवातीपासूनच समुहा मध्ये राहणे पसंद करतो. माणसा माणसा पर्यंत पोहचण्याचा एकमेव दुवा म्हणजे संवाद आहे. त्याला संवाद करायला खूप आवडतो. माणसाचा व्यक्त होणे हा त्याचा स्वभाव आहे. त्याला व्यक्त होता आले नाही तर त्याला अस्वस्थ वाटायला लागते. अगोदरच्या काळी संवादाची माध्यमं फार कमी होती परंतु आता संवादाची भरपूर साधनं निर्माण झाली आहेत. तरी पण मानवाला संवादातील दरी जाणवते आहे. अगोदरच्या काळी संवाद साधायचा असेल तर दवंडी, भजन, कीर्तन, सभा ह्या द्वारे समजा सोबत संवाद साधल्या जायचा. नंतर सिनेमा हे एक फार मोठे माध्यमं त्याद्वारे सुद्धा समाजाचे प्रबोधन व्हायचे. आज टेलीफोन, मोबाईल, ई-मेल, ट्विटर, फेस बुक, व्हाट्सअँप्स, युट्युब या अति जलद मध्यमा द्वारे समजा सॊबत संवाद साधला जात आहे.
अगदी हजारो किलोमीटर दूर असलेल्या मित्र मैत्रीणीला एका मोबाईलच्या क्लिक वर वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविल्या जातात व त्याला त्या प्राप्त होऊन तो सुद्धा सुखावल्या जातो. त्याला सुद्धा आपलेपणा वाटतो व जवळीक निर्माण होते. संवाद कशासाठी तर एकमेकांशी जवळीक साधण्यासाठी, एकमेकाला किंवा एक दुसऱ्याला समजून घेण्यासाठी असतो.
अगोदरच्या काळी एखाद्या व्यक्ती बद्दल विचार करायचा आणि क्षणार्धात तो हजर व्हायचा. एकमेकाला खूप चांगले वाटायचे ते एकमेकाला भेटून संतुष्ट व्हायचे. म्हणायचे की बस मी तुलाच आठवण करत होतो आणि तू लगेच प्रगटला. काय टेलिपॅथी आहे. आज आपण काय बघतो आहे. काय अनुभवतो आहे. तर असे दिसून येते की, एवढी संवादाची साधनं असून सुद्धा संवादातील दरी वाढते आहे. तरीही माणसाला खंत वाटते आहे की, मला जे पाहिजे आहे माझ्या ज्या भावना आहेत त्या एकमेकां पर्यंत पोहचत नाही आहेत. केवळ ह्या मोबाईल मधून त्या मोबाईल पर्यंत संदेश जातो आहे. तो भावनिक स्पर्श, जिव्हाळा पोहचायला पाहिजे तो पोहचत नाही आहे. ह्याची खंत माणसाला जाणवते आहे. कुटुंबामध्ये, घरात व समाजात एकत्र संख्येने आपण राहतो आहे पण दुरावा हा आहेच. हा दुरावा कमी होतच नाही आहे. पण तो दिवसें दिवस वाढतच आहे.
नवऱ्याला काय म्हणायचे आहे ते बायकोला समाजात नाही. जे बायकोला काय म्हणायचे आहे ते नवऱ्याला समाजात नाही. तीच गोष्ट प्रत्येक नात्यात आहे. बापाला काय म्हणायचे ते लेकाला समजत नाही जे लेकाला म्हणायचे आहे ते बापाला समजत नाही. तीच गोष्ट समाजाची सुद्धा आहे.
प्रत्येकाला वाटतं मला समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाचा विचार, उद्देश हा चांगलाच असतो. पण त्याच्या भावना दुसऱ्या पर्यंत पोहचतच नाही ह्याची खंत त्याला वाटतं असते. प्रत्येकजण एकमेकाला संशयाच्या नजरेने बघत असतो. संवाद हा असला तरी दरी असते. कधी कधी तर आपल्याला जाणवत असते की आपसा आपसातील संवाद हा बंद झालेला असतो. पूर्वी म्हणायचे की वाद घातल्या पेक्षा शांत राहणे किंवा एकमेकां पासून दूर राहणे हेच शहाणपण लक्षण आहे. ज्यामुळे वाद होत नाहीत. समाजाचा कल कुठे आहे ते कळत नाही. माणूस हा तसा मनाने चांगलाच आहे. मग तो वाईट विचार का करतो ? तो वाईट विचार का पेरतो ? त्याला दुसऱ्याच्या लफड्यात रुची निर्माण का होते ? दुसऱ्याच्या वादात त्याला आनंद का वाटतो ?
आज टी.व्ही., मालिका ह्या संपूर्ण वादाच्या, एकमेकां विषयी कपट कारस्थानाच्या, एकमेकांच्या लफड्यांच्या, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या, सासू सुनांमधील भांडणाच्या चाललेल्या आहेत. व ह्यात रुची घेऊन बघितल्या जातात व त्याचा टी. आर.पी. सुद्धा जास्त आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही कशी असू शकते ? जेव्हा एक अगोदरच नवरा बायकोचे संबंध प्रस्थापित झालेले असतील. तर दुसरी नवऱ्याची बायको कशी ? तर दुसरीकडे समाज प्रबोधनकार ज्योतिराव फुल्यांची मालिका टी.आर.पी. नसल्यामुळे बंद पडण्याच्या वळणावर आहे. नुकतीच सावित्रीबाई फुलेंची जयंती झाली. त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी किती खस्ता खाल्ल्या, अपमान सहन केला. पण ह्या सावित्रीबाई अजूनही सावित्रीच्या लेकीपर्यंत पोहचल्या नाही ह्याची खंत आहे व त्यांच्या पर्यंत दुसऱ्याच सावित्री पोहचल्या आहेत. ही दुरी संवादाची कायम आहे ती कधी दूर होणार.?

  अरविंद सं मोरे,
  अतिथी संपादक
  गौरव प्रकाशन
  नवीन पनवेल पूर्व
  मोबाइल ९४२३१२५२५१.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *