शेतकरी बांधवांनो सोयाबीन जतन करुन ठेवा कृषी विभागाचे जाहिर आवाहन

अमरावती : यावर्षी खरीप हंगामात मान्सुन परतीच्या पावसाने सोयाबिन पिकाचे काढणीच्या अवस्थेत नुकसान झाले असल्यामुळे पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासू नये तसेच वेळेवर कंपनीचे महागडे बियाणे खरेदी करण्यापेक्षा सोयाबिन बियाण्यांचे जतन करुन ठेवणे अधीक सोईचे ठरु शकते. तसेच सोयाबिन पिकास पर्याय म्हणून सुधारित ज्वारी लावगड करणे शेतकरी बांधवांना फायदेशीर ठरु शकते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

यावर्षी खरीप हंगामात मान्सुन परतीच्या पावसाने सोयाबिन पिकाचे काढणीच्या अवस्थेत नुकसान झाले असल्यामुळे बियाण्याची प्रत खालावली आहे. तसेच यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबिन बियाणे न उगवल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या व या खाजगी बियाणे कंपन्याविरुध्द कारवाई प्रस्तावित असल्यामुळे पुढील खरीप हंगामात या खाजगी कंपन्या त्यांचेकडील सोयाबीन बियाणे विक्रीस ठेवणार नाहीत, किंया कमी प्रमाणामध्ये ठेवतील. त्यामुळे पुढील खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोयाबिनच्या लवकर येणाऱ्या जाती परतीच्या पावसात न सापडल्यामुळे हे सोयाबिन चांगले आहे. व ते शेतकऱ्यांनी जतन करून ठेवले आहे. सोयाबिनच्या सर्वच जाती सुधारीत असल्यामुळे दरवर्षी नविन बियाण्याच्या बॅगा विकत घेण्याची गरज नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे चांगले सोयाबिन आहे त्यांनी दर महिन्याला घरच्या घरी उगवण क्षमता तपासुन आपल्या स्वतःला आवश्यक असणारे व आपल्या नातेवाईकांना लागणारे सोयाबिन राखुन ठेवावे. आर्थिक अडचणीमुळे आताच चांगले सोयाबिन विकणे गरजेचे असेल तर बाजारात नेवुन विकण्यापेक्षा बाजार भावाने गावातीलच ज्या शेतकऱ्यांना पुढील वर्षी सोयाबिन बियाण्याची आवश्यकता असेल अशा शेतक-यांना विकावे.

त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना पुढील वर्षी सोयाबिन लागवड करावयाची आहे त्यांनी आपल्या गावातच किंवा आपले परिसरातील ज्या शेतक-यांनी सोयाबिन राखुन ठेवले आहे, त्यांचेकडुन आत्ताच सोयाबिन खरेदी करून ठेवावे म्हणजे उत्पादन खर्चात सुध्दा बचत होईल व पुढील हंगामात बियाणे न मिळाल्यामुळे होणारा मनस्ताप टाळता येईल,

त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बंधुकडे ओलीताची सोय आहे व काही प्रमाणात शेत रिकामे असेल अशा शेतक-यांनी 15 जानेवारीपर्यंत अर्धा ते एक एकर क्षेत्रावर फक्त बिजोत्पादनाकरीता सोयाबिनची पेरणी करावी.

व या बिजोत्पादन क्षेत्राची चांगली देखभाल ठेवल्यास खरीपा एवढे नाही पण खरीपाच्या 50 टक्के एवढे नक्कीच

चांगले उत्पादन व चांगल्या प्रतीचे बियाणे उत्पादीत होऊ शकते. त्यामुळे अशा शेतक-यांची स्वत:ची व गावातील इशारही शेतक-यांची गरज भागविता येऊ शकतो.

याबाबत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषि विद्यापिठ, परभणी यांनी उन्हाळी सोयाबिन लागवडीचे तंत्रज्ञान विकसीत केले असुन या तंत्रज्ञानाप्रमाणे लागवड करता येईल. शिवाय उन्हाळी सोयाबिनची उगवण क्षमता चांगली राहते. त्यामुळे खरीप हंगामामध्ये 22 ते 25 किलोच एकरी सोयाबिन पेरणी करीता लागेल व यामुळे सुध्दा उत्पादन खर्चात बचत होईल.

पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्याची टंचाई निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी उगीच धावपळ करुन

कोठुनही महागडे सोयाबिन बियाणे प्राप्त करुन घेवु नये. कारण हे सोयाबिन सुध्दा न उगवल्यास किवा भेसळीचे

निघाल्यास आणखी मनस्ताप होईल व हंगाम वाया जाण्याची भिती राहील. त्यामुळे सोयाबिन पिकास सुधारीत ज्वारी लागवड करणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. याकरीता पुढील खरीप हंगामामध्ये उशीरा पक्व होणाऱ्या ज्वारीच्या सुधारीत वाणाची पेरणी करावी.

आज सुधारीत ज्वारीचे असलेले बाजारभाव पाहता ज्वारी व कडव्यापासुन चांगले उत्पन्न किंबहुना सोयाबिन ऐवढेच उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी सामुहिक स्वरुपात ज्वारीची लागवड केल्यास वन्यप्राणी व पक्षांपासून ज्वारी पिकाचे रक्षण करता येऊ शकते. आजकाल बाजारामध्ये नायलॉन दोरीच्या जाळया कमी भावात मिळतात, त्यामुळे सामुहिकपणे अशा जाळया शेताचे सभोवताली लाबल्यास बन्य प्राण्यांपासुन ज्वारीचे रक्षण करता येऊ शकते.

याशिवाय सोयाबीन इतके किड व रोग ज्वारी पिकावर येत नाही व त्यामुळे फवारणी खर्चात बचत होते. तरी शेतकरी बंधूनी पुढील खरीप हंगामात ज्वारीच्या सुधारीत वाणाच्या लागवडीकडे लक्ष द्यावे. याबाबत शेतकरी बंधुनी संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक यांचेशी अधिक माहिती करीता संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अमरावती यांनी केले आहे