• Mon. Jun 5th, 2023

शेतकरी आंदोलन…!

ByBlog

Jan 7, 2021
    शेतकरी आंदोलन
    क्रांतीची सिंहगर्जना झाली
    सारा भारत एक झाला.
    अन्यायकारी कृषी कायद्यासाठी
    शेतकरी रस्त्यावर उतरला.
    संविधानीक हक्कासाठी
    तो संग्रामास तयार झाला.
    भांडवलदारी सरकारच्या
    बनवेगीरीचा फुगा फोडला.
    चर्चाविहिन कृषीकायद्याने
    शेतकरी पेचात पडला.
    शेतकरी एक होताच
    सरकारला घाम फुटला.
    देशाचा खरा पोशिंदा
    मागे नाही हटला.
    कडकडत्या थंडीतही
    छातीची ढाल झाला.
    महिला-पुरूष,तरूण-बालक
    संग्राममोर्चात सामील झाला.
    सरकारच्या छुप्या अजेंडाचा
    काळा चेहरा पूढे आला.
    कितीही लावा तुम्ही बँरेकट्स
    शेतकरी बांधव नाही हरला.
    काळा कायदा रद्द करण्यासाठी
    लोकशाहीचा क्रांतीपथ झाला .
    शेतकरी रस्त्यावर असतांना
    प्रधानसेवक रोशनाईत दंगला.
    कृषी कायदा किती हिताचा
    एकच नारा पाजळत राहिला.
    शेतकरी क्रांती आंदोलनाला
    तोडण्याचा प्रयत्न झाला.
    मीडियाच्या गोदीचँनलने
    जनतेमध्ये भ्रम फैलावला.
    शेतकरी बांधवाने निर्णायक
    महायुध्दाकडे प्रस्थान केला.
    देशहिताचा न्यायासाठी
    प्राणपणाने पेटून उठला.
    -संदीप गायकवाड
    ९६३७३५७४००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *