शिक्षणाचा वापर सेवेसाठी करावा…!

शिक्षण ही कुणाची मक्तेदारी नाही.ते मिळवायला पैसा लागू नये.पण आजची परिस्थीती पाहिली तर या शिक्षणावर मालकी हक्क निर्माण झाला आहे.मोठमोठ्या शिक्षण सम्राटांनी खाजगी शाळा काढून व शिक्षणावर शुल्क आधारुन शिक्षणाची किंमतच वाढवून टाकली आहे.आज उच्च शिक्षणाचं सोडा साधं प्राथमिक शिक्षण ही पैशानं विकत मिळतं.त्यामुळं लोकही पुढं या शिक्षणासाठी झालेला खर्च पाहून तो काढण्यासाठी भ्रष्टाचार करतात असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. शिक्षणाचा उपयोग कसा करावा असा प्रश्न जर कोणी केला तर त्याची गणती हास्यात होईल.कारण प्रश्नच तसा आहे.पण शिक्षणाचा वापर हा माणसानं विधायक कार्यासाठी करावा.
आज वर्तमानपत्रात काही ना काही बातम्या छापून येतात.त्यात काही बातम्या ख-या असतात.तर काही खोट्याही असतात.हे प्रत्यक्ष शहीनिशा झाल्यावर समजते.काही बातम्या शंभर टक्के ख-याही असतात.त्यामध्ये येणारी एक बातमी अशी असते की अमुक डॉक्टरनं गर्भलिंगनिदान चाचणी केल्यानं भ्रुणहत्या झाली. अमुक डॉक्टरनं यकृत व किडणी विकण्याचा व्यवसाय केला.लोकांचंही बरोबरच असतं.कारण आजचे डॉक्टर हे मोठमोठे दवाखाने लावून बसले आहेत.साधारण आजारासाठी अशा रुग्णालयाचे शुल्क हे गरीबांना परवडणारे नाही.त्यांनाही शिक्षण असतं.डॉक्टरकीचं.पण त्या शिक्षणाचा वापर ते गरीब रुग्णाची सेवा करण्यासाठी करीत नाही.
काही वकील मंंडळीही वकीलकीचा अभ्यासक्रम पुर्ण करुन जेव्हा न्यायालयात वकीलकी सुरु करतात.तेव्हा तेही न्याय मिळवून देण्यासाठी अतिरिक्त पैसाच घेतात.तो पैसा सामान्यांना परवडत नाही.अशावेळी गरीबांवर अन्याय झाल्यास त्यानं न्याय कसा मिळवावा? हे वास्तव चित्र आहे.तसेच शिक्षक म्हणून समाजातील मुलं घडविणारा घटक…….तोही शाळेत सेवेच्या दृष्टीनं शिकवीत नाही.तोही मुलांकडून पैसाच घेतो.अशावेळी गरीबांकडे पैसा नसेल तर त्याने आपल्या मुलाला कसं शिकवावं? एवढंच नाही तर अधिकारीही आपल्या शिक्षणाचा वापर चांगला करीत नाहीत..तेही भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करुन पैसा गोळा करतात.
आज आतंकवादीही आपल्या शिक्षणाचा वापर लोकांना नुकसान पोहोचविण्यासाठीच करतात.कारण या आतंकवादी संघटनेचा बारकाईनं अभ्यास करताच त्यात डॉक्टर,इंजीनीयर, अभिनेते असे चांगले चांगले शिकलेले लोकं असतात.
शिक्षण असं शस्र आहे की या शस्राचा वापर विधायक म्हणून केला तर चांगला वापर होवू शकतो आणि विघातक म्हणून केला तर वाईटही उपयोग होत असतो.हे असं का घडतं असा विचार केल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की हे शिक्षण घ्यायला जो पैसा लागतो.तो पैसा हा तो अभ्यासक्रम शिकत असतांना खर्च करावा लागल्यानं कोणीही आज गरीबाची सेवा करीत नाही.
आज आपण पाहतो की आज आमदार खासदारही गरीबांना तुच्छ समजतात.आज साधा गावातील सरपंचही गरीबांना तुच्छ समजतो.ज्यांच्या मतदानानं निवडून येतो त्यालाच तुच्छ समजणं ही बाब आश्चर्य प्रकट करणारी आहे. हेही असे का घडते,तर आमदार खासदार किंवा सरपंचपदाच्या निवडणूकीला जो पैसा लागतो.तो पैसा गरीब देवू शकत नाही.म्हणून हा विचार.
खरं तर असा भ्रष्ट व्यवहार आज वाढत चालला आहे.आज पोलिसही गरीबांची केस घेत नाहीत.याबाबत एक घटना प्रसिद्ध आहे.एक पोलिस ठाणे गरीबांची केसच घेत नव्हते.ती घटना पंतप्रधान चौधरी चरनसिंहला माहित झाली.त्यानंतर ते शेतकरी वेषात त्या पोलिस स्टेशनला गेले.त्यांनी अंगावर मळके कपडे घातल्यानं कोणी त्यांना ओळखूही शकले नव्हते.त्यांनी पोलिसांची भेट घेतली.बैल चोरीला गेल्याबद्दल तक्रार नोंदवा अशी याचना केली.तरीही पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही.परंतू त्यांनी जेव्हा पैसा देणे कबूल केले.तेव्हा ती तक्रार नोंदवली गेली.हाच दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून मानला जातो.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की आज तसे नेते सापडत नाहीत. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत असतांना आपल्याा प्राणाची पर्वा केली नाही.त्या काळासारखे डॉक्टर सापडत नाही.ज्यांनी प्लेगच्या साथीत रुग्णांना मदत करतांना आपला जीव गमावला.पुर्वीसारखे वकीलही सापडत नाहीत,ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यविरांचे खटले निःशुल्क लढले.तसेच त्या काळासारखे शिक्षक सापडत नाही की ज्यांनी शाळेत शिकविता शिकविता स्वातंत्र्यसमरात उडी घेतली.हे असे का घडले. तर त्या लोकांना त्यावेळी शिक्षण शिकायला पैसाच लागला नाही.
मुळात शिक्षण हे शिकायला पैसाही लागत असेल तरी शिक्षणानं आपला स्वभाव का बदलवावा.जर असा शिक्षणान स्वभाव बदलत असेल तर असलं शिक्षण कोणत्या कामाचं असं म्हणावं लागेल.
आज याच दृष्टीकोणातून शिक्षणाचा विचार करायला हवा.तसंच सरकारनंही शिक्षणाचं महत्व वाढवावं.त्यासाठी शिक्षण निःशुल्क करावं.जेव्हा हे शिक्षण निःशुल्क होईल.तेव्हाच शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होईल.यात शंका नाही.तसेच शिक्षणाचा मुळ उद्देश हा सेवेचा असून शिक्षणाचा वापर सेवेसाठीही व्हावा.जेव्हापर्यंत ह्या शिक्षणाचा वापर सेवेसाठी होणार नाही.तेव्हापर्यंत शिक्षणाला महत्वही प्राप्त होणार नाही.हे तेवढंच खरं आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०