• Tue. Sep 26th, 2023

शिंगोरी येथे आगीत घर जळून जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी

ByGaurav Prakashan

Jan 29, 2021

वरुड : तालुक्या अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी येथील ज्ञानेश्‍वर अलोणे यांच्या घराला आग लागली या आगिची दाहकता एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होती की त्यांच्या आजुबाजुला असलेल्या प्रल्हाद अलोणे, पांडूरंग अलोणे यांच्या घराला सुद्धा मंगळवारच्या रात्री १0 वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगिणे घेरले होते. आगिने रौद्र रूप धारण केले असुन लाखोचा कापुस व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारच्या रात्री १0 च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगिणे रौद्र रूप धारण केले. स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतामध्ये पीकावर फवारे करणार्‍या इंजिन स्प्रेपंपचा वापर करण्यात आले. तर स्थानिक नागरिकांनी अग्निशामन विभागाला घटनेची माहीती दिली परंतु अगणिशामनचे वाहण पोहोचण्याच्या आधीच ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर वरूडची अग्निशामन विभागाच्या वाहणाने आगिवर पूर्णत: नियंत्रण मिळवले. यावेळी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे सुद्धा घटनास्थळाव पोहोचले होते. तसेच बेनोडा शहीद पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी घटना स्थळावर पोहचुन घटनेची माहीती घेतली असली तरी आग नेमकी कश्यामुळे लागली याचे नेमके कारण अजुनही कळू शकले नाही हे मात्र नक्की.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!