अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे पाचही जिल्ह्याचे महत्वाचे तथा उच्च शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. विद्यापीठातुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे होत असतात. विद्यार्थ्यांची सर्व प्रशासकीय व शैक्षणिक कामे महाविद्यालयीन स्तरावर होणे अपेक्षित आहे. खेडयातील, लांब अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा विभागात चौकशी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी परीक्षा विभागात तात्काळ स्वतंत्र दूरध्वनीची सेवा उपलब्ध करावी अशी जोरदार मागणी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ मनीष गवई यांनी केली आहे.त्यांच्या या मागणीचे विद्यार्थी संघटना, पालक संघटना, विद्यार्थी वर्गाकडून जोरदार स्वागत केल्या जात आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे विद्यादानचे मुख्य केंद्र आहे. विद्यापीठातुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे होत असतात. विद्यार्थ्यांची सर्व प्रशासकीय व शैक्षणिक कामे महाविद्यालयीन स्तरावर होणे अपेक्षित आहे. खेडयातील, लांब अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक कामासाठी उदा. परीक्षा निकाल, त्रुटी, इतर प्रमाणपत्र आदीसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा विभागात चौकशी करावी लागते. परंतु परीक्षा विभागात कव्हरेज नसल्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत अधिकारी यांचे मोबाईल क्रमांकावर कॉल लागत नाही, त्यामुळे कोरोनाच्या काळात विद्यार्थी स्वता जोखिम घेऊन विद्यापीठात येत आहेत.विद्यार्थ्यांना स्वताचे पैसे खर्च करून विद्यापीठ गाठावे लागत आहे.आधीच लॉकडाउनने पालकवर्ग आर्थिक विवंचने सापडला आहे. शेतकरी हवालदिल झाला असताना त्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर व इतर विभागासमोर गर्दी होत असल्याने कोरोनाला निमंत्रण दिल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना नाहक त्रास होत आहे. याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. आधीच विद्यार्थी विविध ग्रस्त आहे.त्यातल्या त्यात सध्या शैक्षणिक सत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव मुठीत घेऊन विद्यार्थी आपल्या शैक्षणिक कामासाठी दुरून दुरून विद्यापीठात येतात. विद्यार्थ्यांच्या परीक्षा विभाग विषयक समस्यांचं दूरध्वनीवरून निराकरण व्हाव, दूरध्वनीवरूनच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळावा यासाठी परीक्षा विभागात कार्यरत सर्व अधिकायांना स्वतंत्रपणे दूरध्वनी देण्यात यावे, अशी जोरदार मागणी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ मनीष गवई यांनी केली आहे. दूरध्वनी सेवा ही विद्यापीठाला परवड्णारी असून याविषयावर विद्यापीठावर जास्त आर्थिक भार देखील पडणार नाही. दूरध्वनीची सेवा ही 24 तास सुद्धा सुरू राहू शकते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. त्यांच्या या मागणीचे विद्यार्थी संघटना, पालक संघटना, विद्यार्थी वर्गाकडून जोरदार स्वागत केल्या जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी परीक्षा विभागात तात्काळ स्वतंत्र दूरध्वनी सेवा उपलब्ध करावी – डॉ. मनीष गवई
Contents hide