• Fri. Jun 9th, 2023

वाळूचोरांविरोधात महसूल विभाग व शोधपथकांची संयुक्त कारवाईधामणगावरेल्वे तालुक्यात 25 तराफे जप्त

ByBlog

Jan 5, 2021

अमरावती : वर्धा नदीकाठच्या घाटांहून तराफ्याच्या सहाय्याने वाळूचोरी करणा-यांवर महसूल विभाग व जिल्हा शोध व बचाव पथकाने संयुक्त कारवाई करत 25 तराफे जप्त केले.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील वर्धेकाठच्या विटाळा व चिंचोली येथे रेतीघाटांहून नदीत तराफे टाकून वाळू तस्करी होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार गौरव भालगट्टिया यांनी चांदूर रेल्वे उपविभागातील नायब तहसीलदार विलास वाढोणकर यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचारी वर्गाचा समावेश करून पथक तयार केले. जिल्हा शोध व बचाव पथकाच्या जवानांनाही त्यासाठी पाचारण करण्यात आले. या दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई केली.
विटाळा व चिंचोली परिसरात आज सकाळपासून ही कारवाई मोहिम राबविण्यात आली. वर्धा नदीकाठच्या अंदाजे चार कि. मी. लांबीच्या परिसरात वाळू तस्करीसाठी तराफे सोडल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने तातडीने हे सर्व 25 तराफे जप्त केले. त्यानंतर हे तराफे नष्ट करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून हेमंत सरकटे, सचिन धरमकर, कौस्तुभ वैद्य, भूषण वैद्य, अमित घुले, आकाश निमकर, दीपक डोळस, उदय मोरे, योगेश गाडगे, शेख वाहिद यांचा पथकात समावेश होता. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी या कारवाईसाठी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *