• Mon. Sep 25th, 2023

वरखेड फाट्यावर कार-दुचाकीचा भीषण अपघात

ByGaurav Prakashan

Jan 27, 2021

तिवसा : अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरखेड फाट्यानजीक भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली.या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत,
अपघातातील कार मधील जखमी नागपूर येथे एसआरपीएफ जवान असून तो कुटुंबासह कर्तव्यावर जात होता. या अपघातात कारमधील अरुण रामदास सावळे (वय ३0), रेखा अरुण सावळे (वय २८), स्नेहल अरुण सावळे (वय दीड वर्ष) रा.सर्व औरंगाबाद तर दुचाकी चालक गोकूल गुलाब डाहे (वय २५) रा. अंतोरा जिल्हा वर्ष व बाळू बापूराव बारबुद्धे (वय ४0) रा. वाढोना अशी जखमींचे नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की,औरंगाबाद येथून नागपूर येथे सीआरपीएफ जवान अरुण रामदास साळवे (वय ३0) रा.औरंगाबाद आपला कर्तव्यावर कर्तव्यावर नागपूर येथे आपल्या चारचाकी क्र. एम एच0३/बीई0४२५ने आपल्या लहान मुलगी पत्नीसह जात होता. याचदरम्यान अंतोरा येथून दुचाकी क्र.एम २७ ए डब्लू ९६७६ ने वरखेड फाटा जवळ वरखेड येथे दुचाकीने जात असतांना समोरुन येणार्‍याने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की सदर कारने तब्बल चार ते पाच पलट्या खाल्ल्या. यामुळे या कार मधील तीन जण व दुचाकी मधील दोघे असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात मात्र कारचा अक्षरश: चुराळा होता तर दुचाकीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस निरीक्षक रिता उईके या पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी जखमींना तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर कारमधील जखमींना नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले तर तिवसा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली तर पुढील तपास पोलिस निरीक्षक रिता उईके करीत आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!