• Mon. Sep 25th, 2023

रेल्वेद्वारे मागास भागांना जोडत आहोत

ByGaurav Prakashan

Jan 18, 2021

नवी दिल्ली : देशातील जे भाग जोडलेले नव्हते आणि जे मागे पडले होते त्यांना आम्ही रेल्वेने जोडून घेत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमधील केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जोडल्या जाणार्‍या आठ रेल्वेंना सकाळी ११ वाजता हिरवी झेंडी दाखवली. या रेल्वे केवडियाला (स्टॅच्यू ऑफ यूनिटी) वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार आहेत. केवडिया रेल्वेस्थानक अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असून, हे देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकीट प्राप्त रेल्वेस्थानक आहे.रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध शहारांमधून गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ यूनिटीला पाहण्यासाठी पर्यटकांना सहजरित्या येता येणार आहे
रेल्वे योजनेच्या या उद््घाटनाप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची देखील प्रमुख उपस्थित होते. या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात भव्य अशा स्टॅच्यू ऑफ यूनिटीला देखील स्थान मिळणार आहे. तसेच, यामुळे गुजरातमधील पर्यटनास देखील मोठी चालना मिळणार आहे. या अगोदर स्टॅच्यू ऑफ यूनिटी पाहण्यास जाण्यासाठी पर्यटकांना वडोदरा, भरूच आणि अंकलेश्‍वर रेल्वेस्थानकावर पोहचावे लागत होते.
स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.यापूर्वी अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा ९३ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा होता. अवघ्या पाच वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!