• Wed. Sep 27th, 2023

राष्ट्रीय युवा दिन सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

ByBlog

Jan 8, 2021

अमरावती : राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त 12 ते 19 जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी सांगितले.
त्यानुसार 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा कार्यालय व शिवछत्रपती क्रीडा मंडळ, तसेच ‘पीडीएमसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात रक्तदान शिबिर होणार आहे. श्री शिवाजी माध्यमिक शाळेतर्फे 13 जानेवारीला सकाळी नऊला निबंध स्पर्धा होईल. विभागीय क्रीडा संकुलात 14 जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा, 15 ला चित्रकला स्पर्धा होईल. संकुलात 16 जानेवारीला सकाळी 7 वाजता शारिरिक सराव होईल. 17 जानेवारीला यशस्वी व्यक्तींचे अनुभवकथन, 18 जानेवारीला युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन, 19 जानेवारीला टेबल टेनिस व स्क्वॅश स्पर्धा होईल.
कोरोना दक्षता प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करून हे सर्व कार्यक्रम पार पडतील. शाळा- महाविद्यालयांनी सर्व सूचना पाळून ऑनलाईन उपक्रम राबविण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!