अमरावती : अमरावती येथील श्री ह.भ.प. भरत महाराज रेळे हे राष्ट्रीय कीर्तनकार, तथा समाजप्रबोधनकार असून वयाच्या २५ व्या वषार्पासून ते या क्षेत्रात कार्य करीत आहेत, कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शैक्षणिक शिक्षण हे १0 वी पास पयर्ंत करावं लागलं, परंतु सुरुवातीपासून संत चरित्र, सात्विक विचारधारा, यांची आवड, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत श्री गुलाबाबा काटेल या सारख्या संतांचा सहवास, तसेच गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्याचा मनावर झालेला खोलवर परिणाम या सर्व प्रसंगांमधून त्यांच्यातील राष्ट्रीय कीर्तनकार, समाजप्रबोधनकार असं व्यक्तिमत्व उदयास आलं. त्यानंतर त्यांनी गाडगेबाबा मिशन, मुंबई, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आर्शम,अध्यात्म तत्वज्ञान गुरुकुल, मोझरी, गाडगेबाबा समाधी मंदिर,अमरावती, श्री सुखदास महाराज विवेकानंद आर्शम, बुलढाणा, संत उत्तमराव महाराज संस्थान,साळसिंगी,जळगाव अशा अनेक ठिकाणीच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत, व अजूनही होत आहेंत. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सकल संतांचा विचार तसेच अंधर्शद्धा निर्मूलन,शासकीय योजनेचा प्रसार, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव, अस्पृश्यता निवारण, स्त्री पुरुष समानता, आदिवासींचे प्रश्न सप्तखंजरीच्या सहायाने ते आपल्या कीर्तनातून मांडतात. इतकंच नाहीं तर गाडगेबाबा मिशनशी ते अतिशय घट्ट जुळल्या मूळे गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्याबरोबरच कॅन्सर,किडनी, सारख्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करून पुढील उपचारासाठी दादर, मुंबई येथील गाडगेबाबांच्या धर्मशाळेत श्री प्रशांतजी देशमुख यांचे सहायाने निवास,भोजनाची व्यवस्था तसेच तज्ञ डॉक्टरांकडून उपचारार्थ मुंबईला पाठवतात. अशा सात्विक, सोज्वळ, सतसंगी व्यक्तिमत्वाचे धनी असणारे शासनाच्या समाजोपयोगी उपक्रमांना कीर्तन, समाजप्रबोधनातून मांडणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरत महाराज रेळे हे अजूनही शासनाच्याच पुरस्कारापासून वंचित असणे हे अतिशय खेदपूर्ण बाब आहें.
राष्ट्रीय कीर्तनकार भरत महाराज रेळे शासनाच्या पुरस्कारापासून वंचित
Contents hide