• Sun. Jun 4th, 2023

राष्टमाता क्रांतीमाँ सावित्रीबाई फुले..

ByBlog

Jan 2, 2021

  राष्टमाता क्रांतीमाँ सावित्रीबाई फुले..

  परिंदो को नही दि जाती
  तात्लीम उडांनो की
  वो खुद तय करते है मंजिल आसमानो की ,
  रखता है जो होसला आसमान को छुने का
  उसको परवाह नही होती गिर जाने की..
  सावित्रीबाईस प्रथमता नमन करते
  सावित्री बाईचा जन्म 3 जानेवारी १८ ३१ मध्ये सातारा जिल्हातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.आईचे नाव सत्यवती होते तर वडीलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. लग्नापुर्वी त्यांना ख़िश्र्चन मिशन वाल्याकडुन एक पुस्तक मिळाले होते .ते लग्नानंतर त्यांनी सासरी आणले होते.ते जोतीबांनी पाहिल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. आणि त्यांना शिकवण्यासाठी प्रारंभ केला. महिला शिक्षीत झाल्या पाहीजे महीलांचे मनोबल वाढले पाहीजे.त्यांनी अंधश्रद्धेतुन निघायाला पाहीजे आणि गुलामी कशी नष्ट होईल या साठी झटले पाहीजे.असे सावित्रीबाई वाटत होते
  सावित्री जोतीबाचा विवाह १८४० मध्ये झाला आणि शिक्षणास प्रारभं १८४१ केला आणि त्यांनी सात वर्ष शिक्षण घेतले आणि 1 जानेवारी १८४८ पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली ,असे अगणित शिक्षणाचे कार्य जोतीबा व सावित्री यांनी केले.
  भारताच्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या इतिहासातील एक पर्व म्हणजे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता जोतीराव फुले व क्रांतीमाता सावित्रीबाई फुले हे दांपत्य होय. पेशवाईच्या विषवृक्षाची पालवी फुललेली असताना त्यांच्या या दर्प कालखंडात माणसाला माणुसपण नाकारले होते.दैववादी अंधश्रद्धेने माणसाला ब्राह्मणी विचाराने गुलाम बनविले होते. जातपातीच्या विटाळा मुळे अपृश्य लोकांच्या मनावर घात होत होता. स्पर्श ,विटाळ.माहामारी.भूकमारी दारिद्रता, नैराश्य,अज्ञान ,अंधश्रद्धा या मध्ये भारत पार बुडाला होता. सावित्रीबाई चे मोठेपण शब्दात मावत नाही. दिशां दिशातुन सावित्रीचा अंथाग प्रवास आज ही सुरू आहे.कित्येक खेड्यातील पोरी आजही बालवयातच शारीरीक शोषणाला बळी पडतात. त्या सावित्रीचा आक्रोश आज ही आपण ऐकतो पण आपण कधी सावित्री होत नाही.कारण तेवढा त्याग नाही.समाजसेवेचे तेवढे मनोविश्व नाही. किंवा तेवढी तळमळ नाही.दुःख वेचण्यासाठी तेवढा मायेचा पदर नाही..
  आज स्वार्थाने,नेतागिरीने,पोकळ आशावादाने ,माणुस निरर्थक झाला आहे. म्हणून च सावित्रीचे कार्य पृथ्वी मोलाचे कार्य केले आहे..
  यातील महत्त्वाचे पैलू असे की शिक्षणाने सावित्रीने स्वंयदिपाने ,अथक परिश्रमाने सावित्रीने पात्रता सिध्द केली ,सनातण्यांचा बहुजण हित म्हणजे धर्मद्रोह पार नाकारला ,,पाप.पुण्यांचा सिध्दांत नाकारला ,पहिल्या शिक्षका ,पहिल्या मुख्याध्यापिका ,पहिल्या कवियात्री ,एका विधवेचे मुल दत्तक घेऊन त्याला डाँ.बनविले त्या पहिल्या डाँ.ची माता सावित्रीबाई फुले होत १०० त्यांच्याही अधिक महिलांचे बाळतंपण करणारी अनाथाची माय .दुष्काळाच्या कालखंडात तोंडातला घास देणारी अन्नदाता ठरणारी सावित्री माय होती.
  प्लेगच्या माहामारीत पांडुरग नावाच्या मुलाला पाठीवरून दवाखाण्यात नेणारी पहिली समाज सेवा करणारी सावित्री होय
   अपृश्याच्या मुलामुलींना शिक्षण
   जिने दिले,
   त्याच सावित्रीबाईचे आम्ही मुले
   त्याग ,कष्ट ,वेदना,नाही
   जाणल्या तिने,
   तिच्या कष्टाचे मोल जाणतो आज
   आकाशी भरारी घेतो अखंड ज्ञानाने,

  पतीनिधनानंतर हातात तुळई घेऊन पतीच्याच प्रेतयात्रेसमोर स्मशानाची वाट धरणारी पहिली क्रांतीकारक स्त्री म्हणजे सावित्री माई होय..
  हे सर्व लिहणे खुप सोपे आहे ,परंतू हे जीवन जगणे खूप अवघड काम आहे.परिवर्तनवादी जगण्यात काही भोगण अपरिहार्य आहे .पुण्यासारख्या शहरात म्हणजे पेशवाईच्या उरावर वाड्यांतच क्रांतीकारकांचा वैचारिक आखाडा निर्माण करण्याचा न डगमगता जीवन जगणाऱ्या सावित्रीबाईचे धाडस हे जगावेगळेच आहे .अवघड कामेच त्यांची कार्य सिध्दंता होती

   ..जिथे रस्तेच स्मशानभूमीत जातात
   तिथे जळणाऱ्या चित्ता पाहुन हळहळायचे नसते
   घेता आले तर घ्यायाचा असतो
   चित्तेवरील अंगार ,क्रांतीचा श्रूंगार म्हणून
   असे सावित्रीबाईचे जीवन आहे…
   सावित्रीबाई च्या कविता किती आधुनिक वाटतात .काव्य फुले हा काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशीत झाला त्या काव्यसंग्रहातील तीस नं. कविता आहे शूद्र शब्दाचा अर्थ ..
   शूद्र या शब्दाचा ।नेटिव्हा अर्थ
   जेते जे समर्थ ।शुद्रा लावी
   जित झाले शुद्रा ।इराणी भटाचे
   भट इंग्रजाचे ।उग्र शूद्र
   खरे शूद्र धनी होते इंडियाचे
   नाव अशे त्यांचे ।इंडीयंन
   होते पराक्रमी ।आमचे पूर्वज
   त्यांचेच वंशज ।आपण रे

  किती सत्य कथन केले आहे सावित्रीबाईनी..डाँ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव असे विध्दान आहेत की यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथ निर्मिती तुन या विचाराला आपल्या विद्दवत्तेने पृष्टी दिली. योग्य प्रकारे मनुस्मृतीच्या खोल गेलेल्या गुलामी आणि अन्यायाच्या मुळा शोधून काढल्या काढल्या .. सत्य हेच अंतिम आहे की शूद्र हेच या देशाचे मालक आहेत .इंडियन वरून इंडिया हे नाव आहे…म्हणूनच त्यांनी जोतीबा सावित्रीला आपले गुरू मानले आहेत.. पुढे सावित्री म्हणतात ..बाराखडीचा शब्द होता.शब्दाचे वाक्य होते.वाक्याचे साहित्य होते…
  साहित्यातुन नव समाज प्रबोधन होते.. किती समर्पक आहेत सावित्रीबाई चे घोष वाक्य.. सावित्री बाई ह्या समाजातील अनिष्ट रूढी बद्ल लढल्या .त्यांनी कधी ही हार तूर् याचे मोठे होण्याचे स्वप्न पाहीले नाही .असंख्य अपमान सहन केले.पदोपदी अपमान पचवला विषारी घोट पचविले पण त्यांनी कधीही हातातील वसा खाली टाकला नाही. जोतीबाच्या खांद्याला खांदा लावून सावित्री लढत होती. हे दोन जीव या अमानुष अन्यायी समाज अवस्थेवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमवटत मातीत अक्षरे पेरत होती .आणि स्वाभिमानी पिकासाठी मनोभुमीची मशागत करत होते..
  त्याग ,हा सावित्रीचा अलकांर होता.दान हा सावित्रीचा वसा होता.शिक्षण हे सावित्री जोतीबाचे डोळे होते .मन हदय हा त्यांचा फळा होता…बुध्दप्रज्ञा ही त्यांची लेखणी होती..असे उर्जामय ते शब्द होते..त्यांच्या ठायी प्राजक्ताता ची असिमता होती..
  पेशव्याच्या काळात समाज सुधारणा करणे म्हणजे किती महाभयंकर असेल यांचा आपण कधी विचार केला काय?
  आज तर साधी चळवळ राबवता येत नाही. हार तुरे दिल्याशिवाय तो कार्यक्रमात जात नाही…
  मग आपण कोणाचा आदर्श घेतो..याचा विचार होणे जरूरीचे आहे..जर सावित्री जोतीबा नसते तर..इतिहास कसा घडला असता.आणि महिलांची काय र्दुदर्शा असती हे सांगणेच नको..

   ..आज कल की
   अबला हरगीज सबला नही होती
   महाराष्ट्र मै उचीं नारी कि लिला ना
   होती
   असर कर गई पढाई आज के नारी
   की मगर
   सावित्री माई , ना , होती तो
   राष्टपती महिला ना होती…
   क्रांती ज्योती शिक्षणाची धरोहर
   सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने शत शत शत नमन करते

   सुनिता इंगळे

   मुर्तिजापूर
   7218694305

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *