• Sat. Jun 3rd, 2023

राज्यातील उद्योगांना चालना देणार- विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे

ByBlog

Jan 4, 2021

यवतमाळ : कोरोना महामारी आणि टाळेबंदीच्या काळातही महाराष्ट्रात उद्योगांसाठी एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. याचा अर्थच उद्योजकांचा ओढा आणि विश्‍वास महाराष्ट्रावर आहे. ही फार जमेची बाजु आहे. विदभार्साठी विशेष सवलती देण्याचे उद्योग धोरण शासनाने आखले असून महिलांना लघू उद्योजकांसाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणाला शासनाचे प्राधान्य आहे. अशी माहिती राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी स्थापन केलेल्या अनाथपिंडक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे उद््घाटन करण्यासाठी विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे येथे आले होते. शासकिय विर्शाम भवनात प्रत्रकारांशी बोलाताना डॉ. कांबळे म्हणाले की, विदर्भात कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो. विशेषत: जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. म्हणून यवतमाळात टेक्सटाईल पार्कची योजना क्रियाशील करण्यावर भर आहे. अमरावतीला टेक्सटाईल पार्कला अतीशय उत्तम प्रतिसाद आहे. महिलांसाठी छोटे-छोटे गृह आणि लघू उद्योग उभारण्याकरीता महिला क्लस्टर तयार करून त्यांना उद्योग उभारण्यासाठी बर्‍याच योजना हाती घेतल्या आहेत. नागपूरात अगरबत्तीचा असा उद्योग हाती घेतला असून शंभर महिलांचे एक युनिट कितीतरी टन अगरबत्तीची निर्मिती करणार आहे. त्यासाठी लागणार बांबू चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. उद्योगांना चालना देणार विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे काय म्हणाले डॉ.कांबळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना विविध योजनेंतर्गत लाभ देण्याचे निर्देश मी यवतमाळला जिल्हाधिकारी असताना जे प्रेम मला या जिल्ह्यातील नागरिकांनी दिले, ते मी कधीच विसरू शकत नाही. या जिल्ह्यातील जनतेच्या ऋणातुन मुक्त होण्याची कल्पनाही माज्या मनाला शिवत नाही. मी जेथे जातो तेथे यवतमाळ जिल्ह्यातील माज्या अतिशय हर्षवर्धक कार्यकालाचा आणि जनतेने दिलेल्या प्रेमाचा आवर्जुन उल्लेख करतो. उद्योगांची भरभराट व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. जिल्हा हा थोडासा आडवळणी असल्याने मोठ-मोठाले उद्योजक येथे यायला धजत नाहीत. यवतमाळमध्ये विमानतळ उभारण्यात आले असले तरी, उद्योजकांचा प्रतिसाद मिळत नाही. मात्र आता समृध्दी मागार्मूळे उद्योजकांची अडचण दूर होईल असा विश्‍वास आहे. असे डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *