जयपूर : राजस्थानमध्ये अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून चिंताजनक बाब म्हणजे या मेलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लयू या संसर्गजन्य आजाराचे विषाणू आढळून आहे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काही राज्यांसाठी अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
आत्तापयर्ंत कोटा येथे ४७, झालवार येथे १00 तर बरान येथे ७२ कावळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे राजस्थानचे मुख्य सचिव कुंजीलाल मीना म्हणाले. बुंदी येथे एकाही कावळ्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आम्ही आवश्यक पावले उचलतं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती करत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, शनिवारी राजस्थानातील झालवर येथे २५, बरा येथे १९ आणि कोटा येथे २२ तर जोधपूर येथे १५२ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. झालवर, कोटा, पाली आणि इतर ठिकाणांहून कावळ्यांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. यामध्ये किंगफिशर आणि मॅगपाईज नावाच्या चिमण्यांचाही समावेश आहे. झालवर येथे याबाबत कन्ट्रोल रुम स्थापन करण्यात आल्याचे मीना यांनी सांगितले. तसेच संपूर्ण राजस्थानमध्ये हायअलर्ट घोषीत केल्याचेही ते म्हणाले.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे आढळलेल्या मृत कावळ्यांपैकी ५0 कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या ठिकाणीही अलर्ट घोषीत करण्यात आला असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
केंद्र सरकारने राज्यांसाठी अलर्ट घोषीत केला असून ज्या ठिकाणी मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आले आहेत, त्या ठिकाणचे नमुने गोळा करुन त्याच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर संबंधित विभागाने बर्ड फ्लूची लक्षण आढळून आल्याची ठिकाणे निश्चित करण्यासाठी एक मोहिम सुरु केली आहे.
राजस्थानमध्ये आढळला बर्ड फ्ल्यूचा विषाणू
Contents hide