• Wed. Jun 7th, 2023

राजमाता माँ जिजाऊ

ByBlog

Jan 11, 2021
    शिवबाची गुरु । शिवबाची माता ॥ प्रकाशाच्या वाता । पेटविल्या ॥
    धैर्यशील माता । स्वराज्य प्रेरक ॥ ध्यानीमनी एक । ध्येयवाद ॥
    शिवबा संभाजी । जिजाऊ संस्कार ॥ करी तलवार । तरबेज ॥
    संस्कार सुंदर । आदर्श जीवन ॥ शिवबाचे मन । घडविले ॥
    मुलामुलींवर । जिजाऊ संस्कार ॥ थोर ते विचार । आचरावे ॥
    प्रजा नि मावळे । स्वराज्याचे धन ॥ शिवबाचे तन । घडविले ॥
    मायाळू ममता । तन कणखर ॥ खड्गाचे वार । करितसे ॥
    सिंदखेड राजा । एक मातृतिर्थ ॥ जीवनाचा अर्थ । कळतसे ॥
    शंभुशिवबांची । वात्सल्याची मूर्ती ॥ गाऊ सर्व किर्ती । जिजामाता ॥
    राज घराण्याची । जिजा राजमाता ॥ पेटविल्या वाता । सुराज्यात॥
    स्मृतिंना मूंल्यांना । जपावे आपण ॥ घडवावे जन । जीवनात ॥
    जिजामाता एक । स्वराज्य जननी ॥ गाऊनिया गाणी । जन्मदिनी॥V
      त्याग समर्पण । भाव मूर्तिमंत ॥ प्रेरणेचे स्त्रोत । जिजामाता ॥
      संपविले भेद । समतेचे राज ॥ बंधुतेचा साज । स्वराज्यात ॥
      स्वराज्य रक्षण । नीती अधिष्ठान ॥ कर्माचा सन्मान । दरबारी ॥
      जन्मदिनी आज । करितो नमन ॥ कराने वंदन । कोटी कोटी ॥
      महात्मा जोतीराव फुले राजस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
      कवी, लेखक
      -प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
      रुख्मीणी नगर, अमरावती.
      भ्रमणध्वनी : 8087748609

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *