• Tue. Sep 26th, 2023

रस्ते अपघातांमुळे केवळ परिवाराचीच नव्हे तर देशाचीही हानी : राजनाथ सिंह

ByGaurav Prakashan

Jan 19, 2021

नागपूर : रस्त्यांवर होणार्‍या अपघातांमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या परिवाराची न भरून निघणारी हानी तर होतेच. पण देशाचीही हानी होते. म्हणून रस्ते सुरक्षा जनजागृतीचे उपक्रम नेहमीसाठी देशभरात सुरू असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले.
नवी दिल्ली येथे आज केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयातर्फे झालेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना या उपक्रमाचा संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी, महामार्ग वाहतूक व परिवहन राज्यमंत्री जन. व्हि. के. सिंग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी रस्ते अपघातांमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात तीन टक्क्यांची हानी होत असल्याचेही सांगितले. हा उपक्रम नेहमीसाठी सुरू राहिला तर जनतेमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती निर्माण होईल. वास्तविक रस्ते अपघात कमी करणे हे सामान्य आव्हान नाही. पण आम्ही हे आव्हान स्वीकारले आहे. आज १८ ते ४५ या (पान ६ वर)
५0 टक्के अपघाती मृत्यू रोखणार : ना. गडकरी
येत्या २0२५ पर्यंत रस्त्यांवर होणारे अपघाती मृत्यू ५0 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दरवर्षी दीड लाखांपेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे. रस्त्यावर होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे डिझाईन तयार केले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ रस्ते बांधण्याचे कामच करीत नाही, तर वाहतूक नियमांच्या पालनासाठी विविध संस्था, जनतेमध्ये जनजागृतीही करण्याचे काम करते. अपघातात मृत्यू पावणार्‍यांचे जीवन वाचवणे हा एकमेव उद्देश आमचा आहे. दररोज ४१५ लोक रस्ते अपघातात दगावतात अशी आकडेवारी समोर आली आहे. तामिळनाडू सरकारने रस्ते अपघातात ५३ टक्के नियंत्रण आणले आहे. त्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूची संख्याही घटली आहे. देशभरात महामार्ग प्राधिकरण लोकसहभागातून रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही गडकरी म्हणाले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!