अमरावती : स्थानिक जगदंब महाविद्यालय, अचलपुर शहर येथे छात्रसंघ समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती ,युवक दिना निमित्त 12 जानेवारी राेजी आँनलाईन व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात डाँ.पी आर .राजपूत ,प्राचार्य क.रा. इन्नानी महाविद्यालय ,कारंजा लाड यांनी “युवकांचे प्रेरणास्थान – स्वामी विवेकानंद ” या विषयावर अत्यंत माैलिक मार्गदर्शन केले.
डाँ. राजपूत यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या आधारे त्यांच्या जीवनचरित्राला गवसणी घातली .निर्भय आणि शक्तीमान व्हा, सर्वांवर प्रेम करा आणि शिक्षण घ्या स्वामी विवेकानंदांनी सांगीतलेल्या या त्रिसुत्रीचा अवलंब करुन युवकांनी चारित्र्यसंपन्न व्हावे व राष्टनिर्माणात याेगदान द्यावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी युवकांना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाँ. पी. जी .राेहणकर यांनी अलीकडे युवकांच्या बदलत चाललेल्या वर्तनाबाबत खंत व्यक्त केली आणि आजच्या युवकांनी विवेकानंदांच्या आदर्श विचारांना अंगीकारण्याची गरज प्रतीपादीत केली.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डाँ.जी .यू. खापेकर यांनी युवकांना राष्टनिर्माणात याेगदान देण्यास प्रेरीत करण्याकरीता अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज असल्याचे प्रतीपादन केले.पाहुण्यांचा परिचय डाँ. मिलींद तायडे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डाँ. कुमुदिनी जाेगी यांनी केले तर प्रा. ए.ए. पाखरे यांनी आभारप्रदर्शन केले.प्रा. वाहने,प्रा. व्ही सी . पाटील, प्रा. दारुंडे, प्रा खंडेराव यांचे तांत्रीक सहाय्य लाभले.कार्यक्रमाला माेठ्या प्रमाणात प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी जुळले हाेते.हेच आैचित्य साधुन स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी व दैदीप्यमान व्यक्तीमत्वाचा युवकांना परीचय व्हावा याहेतुने “स्वामी विवेकानंद जीवनचरित्र परीचय ” राज्यस्तरीय आँनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ही आयाेजन करण्यात आले हाेते .सदर स्पर्धेला संपुर्ण राज्यभरातुन प्रचंड उस्फुर्त प्रतीसाद लाभला.
युवकांनाे चारित्र्यवान बना व राष्टनिर्माणात याेगदान द्या.- प्राचार्य डाँ. राजपूत यांचे युवकांना आवाहन
Contents hide