• Thu. Sep 28th, 2023

..म्हणून पडतात अकाली सुरकुत्या

ByGaurav Prakashan

Jan 20, 2021

अकाली पडणार्‍या सुरकुत्या टाळण्यासाठी त्वचा अधिकाधिक काळ तरूण, टवटवीत राखणे गरजेचे ठरते. पण याची काळजी घेतानाच अकाली सुरकुत्या का पडतात हे पाहू या..
६ चेहर्‍यावर सतत मेक अपची पुटं असतील तर रोमछिंद्र बंद होतात आणि त्वचेतील ओलावा कमी होऊ लागतो. अशी कोरडी त्वचा अकाली सुरकुत्यांना आमंत्रण देते. ६मोबाईलमधून निघणार्‍या लहरीदेखील अकाली सुरकुत्या पडण्यास कारणीभूत असतात. ६ औषधांच्या अतीसेवनामुळे अकाली प्रौढत्व येण्याची शक्यता असते. ६ अतिरिक्त प्रमाणात चहा-कॉफीचे सेवन करत असाल तर त्वचेवर अकाली सुरकुत्या पडण्याची शक्यता अनेकपटीने वाढते. या पेयांच्या सेवनाने त्वचेतील पाणी कमी होते आणि ओलावा नाहिशा झालेल्या रुक्ष त्वचेवर अकाली सुरकुत्यांचा धोका वाढतो. म्हणूनच चहा-कॉफीचे सेवन केल्यानंतर काही काळाने ग्लासभर पाणी प्यावे. ६ व्यायामादरम्यान मांसपेशी अधिक क्षमतेने कार्यरत होतात आणि त्वचेचे तारुण्य जपतात. म्हणूनच अकाली सुरकुत्यांचा धोका टाळण्यासाठी व्यायामाचा मंत्र जपायला हवा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!