अमरावती, दि. 20 : मोर्शी तालुक्यातील 26 जानेवारी रोजीचा ध्वजारोहण समारंभ उप विभागीय कार्यालयाच्या आवारात सकाळी 9.15 वाजता होणार आहे. याअनुषंगाने तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महाविद्यालय, शाळेचे मुख्याध्यापक व समस्त नागरिकांनी याबाबत नोंद घेण्याचे आवाहन मोर्शीचे तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी केले आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या 8 जानेवारी रोजीच्या पत्रानुसार 26 जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिन साजरा करावयाचा असल्याने मोर्शी तालुक्यात ध्वजारोहणाचा शासकिय समारंभ सकाळी 9.15 वाजता करण्याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सुचनांचे अनुपालन करुन समारंभाचे आयोजन करण्याचे कळविण्यात आले आहे.त्यानुषंगाने राष्ट्रध्वजारोहण हे सबंधित प्रांत अधिकारी (उपविभागीय अधिकारी) यांनी त्यांच्या मुख्यालयी अध्यक्ष स्थान स्विकारुन करण्याचे सूचना आहेत. मोर्शी उपविभागीय स्तरावरील ध्वजारोहणाचा कार्यक्रम दरवर्षी शासकिय जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात घेण्यात येतो.परंतू, सद्य:स्थितीत सदर प्रागंणात विकास कामे सुरु असल्याने ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम त्या ठिकाणी घेणे शक्य नसल्याने सदर मुख्य कार्यक्रम उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांच्या कार्यालयाच्या आवारात 26 जानेवारी राजी सकाळी 9.15 वाजता होईल. मोर्शी तालुक्यातील शासकिय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व महाविद्यालय व शाळेचे मुख्याध्यापक व समस्त नागरिकांनी ठिकाणाच्या बदलाबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन मोर्शी तहसीलदार यांच्याव्दारे करण्यात आले आहे. याबाबत नोंद घ्यावी.
मोर्शी येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार उप विभागीय कार्यालयाच्या आवारात
Contents hide