• Thu. Sep 28th, 2023

माझा कर्णनाद : नव्या उमेदीची ऊर्जा

ByGaurav Prakashan

Jan 19, 2021

प्रा.विनोद मेश्राम सर यांनी नुकतीच घरी भेट दिली .त्यांनी स्वतःच्या जीवनावरील संघर्षावर लिहलले माझा कर्णनाद हे छोटेखाणी पुस्तक भेट म्हणून दिले.हे पुस्तक वाचतांना व्याधीग्रस्थ शरीर असूनही लेखकांने आपले कार्य न थांबवता जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.जोपर्यंत मानसिक बल शरीरात आहे तोपर्यंत मी हरणार नाही हा आशावादी मूल्यगर्भ विचार मांडला आहे.
या पस्तकाच्या प्रस्तावनेत मनोहर मेश्राम लिहितात की,”वास्तविक जीवनात वावरताना शारीरिक व्याधी असली तर स्वतःच्या ध्येयापासून वंचित होणारे असंख्य माणसे असल्याचे अनुभवास येतात .मात्र अनेक संकटाचा सामना करून साहित्य व सामाजिक क्षेत्र ओतप्रोत भरलेले विनोद मेश्राम निराळेच..!”हा विचार सत्यदर्शन घडविणारा आहे.तर विनोद मेश्राम आपल्या मनोगतात म्हणतात की,”जीवन फार अनमोल आहे.त्यामुळे त्याला आपण आकार देऊन अनेक अंगानी बहरून व फुलवून सजग करू शकतो.मात्र आपली ईच्छा शक्ती प्रबळ पाहिजे .अन्यथा जीवन असूनही अर्धमेसारखेच आहोत असे म्हणावयास कुठे तरी जागा आहे.’
माझा कर्णनाद हे पुस्तक लेखकांच्या जीवनातील आलेल्या संघर्षाचा आलेख मांडते.आपण कठीण प्रसंगातून कसा मार्ग काढला यांची जाणीव वाचकाला करून देते.व्याधीग्रस्त शरीर असतांनाही लेखन व समाज कार्य यांच्यामध्ये अंतर पडू दिलं नाही.मदत करणाऱ्या डॉक्टरचे व इतर समाजातील माणसाचे अनोखे भावबंध अचूक रेखाटले आहे.निसर्गाचा समतोल राखनं हे मानव जातीचं शिकलं पाहिजे.नाहीतर पर्यावरणाचा ऱ्हास होऊन मानव जातीचा नाश ठरला आहे हा इशारा वाचकाला दिला आहे.
प्रा.विनोद मेश्राम याचा पिंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतीराव फुले,शाहू महाराज यांच्या विचारांने ओतप्रोत भरलेला आहे.व्याधीग्रस्त शरीराला नवा आत्मविश्वास देण्याचे काम त्यांच्या साहित्यातून लेखकाला मिळाले आहे.जीवनातील कठीण प्रसंगातून कॉलेजचा संघर्ष कसा पार केला यांचे मर्मभेदी विश्लेषण त्यांनी उत्कृष्टपणे केले आहे.लेखकाचा स्वभाव मुळातच बंडखोर व तापट आहे पण त्या मनात संवेदशील भावना जागृत आहेत . लेखकांन आपल्या परीने लोकांना मदत केली आहे.स्वतःची दुःख गोजारत बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या दुःखा नेहमी धावून गेले आहेत.ते सच्चे कार्यकर्त्ये आहेत.ते शरीराने व्याधी ग्रस्त असले तरी त्यांनी मनाला व्याधी होऊ दिली नाही.म्हणून त्यांनी आपल्या जीवनातील आव्हानाचा सामना केला आहे.
विनोद मेश्राम यांनी या पुस्तकातून स्वःजीवनाचा मुक्त आविष्कार रेखांखित केला आहे.व्याधीग्रस्त मानवाला नव्या उमेदीची ऊर्जा देण्याचे काम हे पुस्तक नक्कीच करेल हा आशावाद आहे.मज माणूस द्या या लेखातून माणसाच्या जीवनाचे सोने कसे व्हावे याचे क्रियाशील वर्णन केले आहे.तथागत बुध्दाच्या धम्माची आज नितांत गरज आहे असे मत मांडले आहे.
माझा कर्णनाद हे पुस्तक मानवीय मनातील संवेदशील भावस्पर्शतेचा आवेग असून व्याधी ग्रस्त माणसाना नवा जोश देणारे पुस्तक आहे.मरगळलेल्या व थकलेल्या शरीरात नवे अणुतेज पेरणारे आहे.हे पुस्तक वाचकाला नवा परिवर्तनासाठी सज्ज करते.या पुस्तकात नवा आयाम असला तरी काही मर्यादा आहेत.लेखकांने ईश्वरीय भूमिकेची मांडणी करताना थोड्या वास्तवादी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार करावा .ईश्वर,देव ,असे शब्द आपण टाळले पाहिजे.पुढील पुस्तकात या चूका येणार नाही यासाठी लेखकांनी खबरदारी घ्यावी. लेखकांनी हे पुस्तक लिहून वाचकाला अंतर्मुख केले आहे.त्यांच्या पुढील लेखनप्रवासाला लाख लाख मंगलकामना चिंतितो…!
-संदीप गायकवाड
९६३७३५७४००

Thank you for reading this post, don't forget to subscribe!