• Thu. Sep 28th, 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित

ByGaurav Prakashan

Jan 16, 2021
    शैक्षणिक सत्र 2021-21 साठीचे
    प्रवेशित व नुतणीकरणाचे अर्ज तत्काळ सादर करण्याचे आवाहन

अमरावती, : सामाजिक न्याय विभागाव्‍दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विभागाच्या महाडीबीटी प्रणालीवर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित व नुतणीकरणाचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल 3 डिसेंबरपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. तथापि, अद्यापपर्यंत जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रर्वगाचे 4 हजार 700 अर्ज व इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे 8 हजार 273 अर्ज संख्या आहे. याअनुषंगाने आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असतांना महाविद्यालयांकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते.
याअनुषंगाने, कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयात उपस्थिती कमी आहे, ही परिस्थिती असताना, कुठल्याही गोर-गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित महाविद्यालयांनी त्यांच्या महालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांशी तत्काळ संपर्क साधून शिष्यवृत्ती अर्ज भरुन घ्यावेत व महाडीबीटी पोर्टल संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया करुन अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची पध्दती :

जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पोर्टलवर कागदपत्रानिशी परिपूर्ण अर्ज सादर करण्यासंदर्भात अवगत करावे. सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या लॉगीनवर सादर करावे. अपूर्ण किंवा कागदपत्रे कमी असलेल्या अर्ज विद्यार्थी लॉगीनवर त्रुटींची पुर्ततेसाठी परत करावे. विद्यार्थ्यांचे कागदपत्रे प्राचार्यांच्या लॉगीनमधून कागदपत्रे अपलोड करुन कोणती कागदपत्रे अपलोड करुन केवळ ऑल ओके असा शेरा नमूद करु नये.
नुतणीकरण विद्यार्थ्यांची यादी सादर करतांना, नुतणीकरणाचा अर्ज भरतांना प्रथम वर्षाचा अर्ज ज्या योजनेत (स्कीम) मंजूर झालेला आहे त्याच योजनेत (स्कीम) भरण्याचे आदेशीत करावे. स्कीम बदलवू नये. नुतणीकरणाचे अर्ज नुतणीकरणाच्या विवरणापत्रात भरण्यात यावे, फ्रेश विवरणामध्ये भरण्यात येऊ नये याची नोंद घ्यावी.शिष्यवृत्तीच्या नवीन व नुतणीकरण अर्जासाठी लागणारे कागदपत्रांची सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयाशी व संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (समाज कल्याण) यांनी केले आहे.