व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्म अपचा सल्ला दिला जातो. यात केले जाणारे अवयव ताणण्याचे (स्ट्रेचिंग) प्रकार शरीराला व्यायामासाठी सिद्ध करणारे असतात. ताणल्यामुळे शरीर चपळ आण लवचीक बनते. म्हणूनच व्यायामाचा योग्य परिणाम साधण्यासाठी वॉर्म अप गरजेचे ठरते.
रव्यायामामुळे स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी ताणल्यास शरीर व्यायामासाठी सज्ज होते. तीव्र स्वरूपाच्या व्यायामांपूर्वी शरीर ताणणे गरजेचे आहे. स्नायू व्यायामादरम्यान जास्त कार्यरत रहात असल्याने शरीराला ताण द्यायला हवा. व्यायामामुळे ज्या स्नायूंवर ताण पडणार ते सर्वात आधी ताणावे. र ताणण्याच्या व्यायामांमुळे शरीर लवचीक बनते. यामुळे आपण सहजपणे व्यायाम करू शकतो. शरीराला हळूहळू व्यायामाची सवय होते. ताणल्यामुळे स्नायू मोकळे होऊन हालचाल सुलभ होते. रव्यायामामुळे स्नायूंची झीज होत असते. स्नायूंची रचनाही बदलू शकते. मात्र ताण दिला गेल्यामुळे स्नायू पूर्वपदावर येतात आणि त्यांचे काम योग्य पद्धतीने सुरू राहते. म्हणूनच वॉर्म अप टाळू नये.
महत्त्व वॉर्मअपचे ..!
Contents hide