आहाराचा तक्ता ठरवणे आणि त्याची अंमलबजावणी हे वाटते तेवढे अवघड काम नाही. आपल्या पारंपरिक थाळीत याची पूर्णपणे काळजी घेतलेली दिसते. पण सध्या वेगवेगळ्या डाएट्सच्या नावाखाली विविध प्रयोग होताना दिसतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय आहारातून एखादा पोषक घटक पूर्णपणे हद्दपार केला जातो. अर्थातच शरीरावर याचे काही दुष्परिणाम होतात. कमी कबरेदकयुक्त आहार हा सुद्धा असाच एक प्रकार. कबरेदकांच्या विघटनानंतर त्याचे रूपांतर साखरेत केले जाते. मेंदू कार्यरत ठेवण्यासाठी या साखरेचा वापर होतो. आहारातून कबरेदक पूर्णपणे बाद केल्याने किंवा कमी केल्याने मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. कबरेदकांच्या कमी प्रमाणामुळे मळमळणे, डोकेदुखी, चिंताग्रस्तता अशा समस्या निर्माण होतात. आहारात साध्या कबरेदकांऐवजी गुंतागुंतीच्या कबरेदकांचा समावेश करायला हवा. केळी, हातसडीचा तांदूळ, छोले, डाळी आणि पूर्ण धान्यामध्ये अशी गुंतागुंतीची कबरेदक असतात. मेंदूचे कार्य सुरळीत सुरू रहावे यासाठी कोलेस्टेरॉल आण सॅच्युरेटेड फॅट्सदेखील गरजेचे असतात. लो फॅट डाएटचा मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. कोलेस्टेरॉल आण फॅट्सचा बाऊ करून हा घटकपूर्ण वज्र्य करणे घातक ठरू शकते. शरीराप्रमाणे मनाचे आरोग्य जपणेही गरजेचे असते. यादृष्टीने ड जीवनसत्त्व आणि ओमेगा ३ फॅटी अँसिड्सयुक्त आहार घ्यायला हवा.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Related Stories
September 29, 2023
June 6, 2023