मधुमेहाबाबत घ्या काळजी

मधुमेहाच्या वाढत्या प्रसारामुळे त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकडील कल वाढला आहे. त्यात नवीन संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांची भर पडत आहे. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात होणारे बदलही गर्भाला भविष्यात मधुमेह होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे गरोदरपणाआधी महिलांची तपासणी करायला हवी. देशातील बहुसंख्य गरोदर महिलांमध्ये पोषणमूल्यांची कमतरता आढळते. त्यांची मधुमेहाची तपासणी केली जात नाही. त्यामुळे गर्भाला भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. मधुमेहपूर्व टप्पा फास्टींग शुगर या तपासणीनंतर रक्तातील साखरेची पातळी १00 ते १२६ दरम्यान असेल तर ती व्यक्ती मधुमेहपूर्व टप्प्यात असते. जेवणानंतरच्या तपासणीत साखरेची पातळी १४0 ते २00 दरम्यान असेल तर हा मधुमेहपूर्व टप्पा असतो. मधुमेहपूर्व टप्प्यातील ५0 टक्के व्यक्ती पुढच्या दहा वर्षात मधुमेही होतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी व्यायाम आणि आहारात बदल करून मधुमेह रोखण्याची गरज असल्याचं तज्ज्ञ व्यक्त करतात. सध्याच्या वजनापेक्षा दहा टक्के वजन कमी केलं तर मधुमेहपूर्व टप्प्यातून मधुमेही होण्याची शक्यता ५0 टक्क्यांनी कमी होत असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!