नांदगाव खंडे : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा नांदगाव खंडेश्वर यांच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी विनोद खेडकर , ठाणेदार गोपाल उंबरकर उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघाच्या वतीने योद्धा म्हणून सन्मानपत्र देण्यात आले. तहसीलदार पियुष चिवंडे यांना सन्मानपत्र देण्यात आले नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणाले की , कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची , कायद्याची बाजू पाहण्याची न्याय देण्याची जबाबदारी न्याय पालिकेची, सामान्य नागरिकांना योजना देण्याची जबाबदारी नोकरशाहीची, लोकशाही टिकवणे व मजबूत ठेवणे ही जबाबदारी सर्व मिळून करावी लागते. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार नोकरशाही भान ठेवून जबाबदारी पार पाडते चुकत असेल तर पत्रकाराच्या माध्यमातून निदर्शनास आणून देण्याचे काम करतात. मंचावर उपस्थित संजय पोफळे राज्य उपाध्यक्ष, प्रदीप जोशी जिल्हाध्यक्ष, सुरेश ढवळे जिल्हा सल्लागार, उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष दुर्गेश सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक अध्यक्ष शाम शिंदे, व आभार प्रदर्शन सचिव अमोल इंगोले यांनी केले. , डॉ. संजय जेवडे, विशाल ढवळे, भगवंत ब्राह्मणवाडे, अमोल धवसे, विवेक पाठक, संदीप अंभोरे , डॉ. वासुदेव गावंडे, प्रा. गजानन काकडे, श्याम बोरकर, नरेंद्र लांजेवार, अनिल राऊत, हंसराज उके, प्रशांत श्रृंगारे आदी पत्रकार उपस्थित होते.