अमरावती : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, तसेच दिव्यांग व दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणा-या व्यक्ती व संस्थांना शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरविले जाते. त्यासाठी 25 जानेवारीपूर्वी समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
अर्जासाठी पुरुषांसाठी वयोमर्यादा 50 वर्षे किंवा त्याहून अधिक व महिलांसाठी 40 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. अर्जाचा नमुना व माहिती समाजकल्याण कार्यालय, दुसरा माळा, सामाजिक न्यायभवन, पोलीस आयुक्तालयामागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती यांच्याकडे उपलब्ध आहे.
Contents hide