साहित्य : लहान आकाराचे कांदे अर्धा किलो, किसलेले खोबरे पाव वाटी, चार चमचे तीळ, २५0 ग्रॅम दाणे, जिरे, धणे, १ चमचा गोडा मसाला, ओले खोबरे, कोथिंबीर, तिखट, मीठ, चिंचेचे पाणी, गूळ, फोडणीचे साहित्य.
कृती : कांद्याचा वरचा व थोडा खालचा भाग व साल काढून चार फाकी होतील अशी चिरावीत. नंतर खोबर्याचा कीस, तीळ व शेंगदाणे, धने, जिरे हे सर्व कोरडे भाजून कूट करावे. या कुटात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ, मसाला, थोडी हळद, १-२ चमचे तेल व चिंचेचे पाणी घालून बारीक वाटावे व हे सर्व मिर्शण कांद्याच्या चार फाकीमध्ये फाक वेगळी होऊ न देता दाबून भरावे.
कढईत फोडणी तयार करून त्यात भरलेले कांदे टाकावेत व मंद आचेवर ठेवून थोड्या वेळाने रस्स्याकरिता गरम पाणी टाकून उकळू द्यावे व साधारण कांदे नरम झाल्यावर त्यात कोथिंबीर व ओले खोबरे टाकावे. ही भाजी चवदार लागते.आजचा मेन्यू
भरल्या कांद्याची भाजी
Contents hide