उमरेड : उमरेड येथील परसोडी निवासी डॉ. नीलिमा सुखदेव नंदेश्वर (वय ३५) ही गुरुवारी सकाळी ९ वाजता आईला घेऊन वरोर्याला जाण्यासाठी कार क्र. एम. एच. ४0 / बी. ई. 0८८७ ने निघाली. वरोर्याकरिता गिरड समुद्रपूर मार्गाने जात असताना वाटेत मोठा दगड आल्याने गाडी अनियंत्रित होऊन पलटी झाली. यामुळे तिला गाडीचा जब्बर मार लागल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ती आनंदवन कृषी महाविद्यालय, वरोरा येथे प्राध्यापक होती. तिचे शिक्षण एम.एसस्सी, पीएच. डी. अँग्री इकोनॉमिक्समध्ये झाले होते. तिला उत्तम शिक्षक म्हणून बंगळुरू विद्यापीठाने सन्मानित केले होते. पीएच.डी.सुद्धा त्याच विद्यापीठातून मिळविली होती.
येत्या १0 जानेवारी २0२१ ला तिचे लग्न नागपूर येथील डॉ. अश्विन खेमराज टेंबेकर यांच्याशी होते. त्यांचे नागपूर येथे खासगी रुग्णालय असून, ते डेंटल सर्जन आहेत. अवघ्या तीन दिवसांनंतर उमरेड येथे लग्न पार पडणार होते. मात्र, नियतीला काही मान्य नव्हते म्हणून बोहल्यावर चढण्याआधीच तिचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तीन दिवसांनंतर लग्न विधी असल्याने घरी काही पाहुणे आले आहेत. लग्नाचे घर असल्याने घरात आनंदाचे वातावरण असताना बघता बघता एकदम दु:खाचे सावट कोसळल्याने नंदेश्वर कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.
बोहल्यावर चढण्याआधीच डॉक्टर तरुणीवर नियतीचा घाला.!
Contents hide