• Mon. Sep 25th, 2023

बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ

ByGaurav Prakashan

Jan 15, 2021

अमरावती : महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा दोन हजार रुपये याप्रमाणे लागू असणार्‍या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक ८ टक्के वाढ करण्यास व ती २0२१/२२ या आर्थिक वषार्पासून लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ जानेवारीच्या मान्यता देण्यात आली, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिली. बाल कल्याण समितीच्या बैठका दरमहा १२ वरून २0 करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये एक हजार रुपयांवरून पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यास देखील बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत बाल संरक्षणाशी सबंधित कार्यान्वित यंत्रणेची गुणवत्ता वाढविणे आणि त्या बळकट करणे या उद्देशाने एकात्मिक बाल संरक्षण योजना ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २0१२/१३ पासून महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटीमार्फत राबविण्यात येत आहे. अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील उपयोजनांची नवीन नावे लागू करणे व योजनांमधील विविध बाबींचे सुधारित दर लागू करण्यास यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, ह्यबाल संरक्षण सेवा या उपयोजनेच्या दरात केलेल्या सुधारणेप्रमाणे बदल अद्याप अंमलात आलेले नाहीत. परिणामी निधी वितरित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!