• Mon. Sep 25th, 2023

बस अपघातात जखमी झालेल्या सर्व रुग्णांना उपचारासाठी लागणार खर्च शासन करणार !

ByGaurav Prakashan

Jan 20, 2021

वरुड : वरुड तालुक्यातील ढगा येथे १७ जानेवारी रोजी नागपुर वरुन वरुडकडे येत असलेल्या महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाची काटोल आगाराची बस क्रमांक एम.एच.४० एक्यु ६०५६ ढगा गावाजवळ सदावर्ती नदिच्या पुलावर विरुध्द दिशेने येणारा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२७ पु ११२५ ला जोरदार धडक लागल्यामुळे बस नदिपात्रामध्ये कोसळली. बसमधील २२ प्रवासी जखमी झाले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ उपचार करणेसाठी तातडीने ग्रामीण रुग्नालय, वरुड येथे हलविण्यात आले. त्यापैकी १२
प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वरुड येथुन जिल्हा सामन्य रुग्नालय, अमरावती येथे हलविण्यात
आले आहे. जखमी असलेल्या सर्व प्रवाशांना शासनामार्फत उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता जखमींना शासनामार्फत उपचार करण्यासाठी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याची मागणी
आमदार देवेंद्र भुयार यांनी परिवहन मंत्री अनिलजी परब यांच्याकडे केली आहे .बस अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना खाजगी किंवा शासकीय दवाखान्यात येणार खर्च परिवहन महामंडळ तर्फे करण्याचे निर्देश आमदार देवेन्द्र भुयार यांनी विभाग नियंत्रक यांना दिले आहे.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी एसटी अपघातातील जखमी कुसरे व नागदिवे परीवारांची भेट घेऊन एसटी अपघातामधील जखमीना खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणार असल्याची माहीती मोर्शी- वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
आमदार देवेंद्र भुयार यांनी बस अपघातामध्ये जखमी झलेल्या प्रफुल मुंदाने सहूर, चंद्रशेखर टरके सहूर, हनिफ शहा शेघाट, अफसाना शहा शेघाट, मधुकर नागदेवे वरुड, कांता नागदेवे वरुड, निलेश नागदेवे वरुड, कैलास कुसरे वरुड, बस्तीराम युवनाते शेघाट, शिंधु युवनाते शेघाट, आनंद वाघमारे जरूड, रवींद्र सर्याम कुरळी, रामदयाल सिरसाम वरुड, ज्ञानेश्वर धर्माला चिंचरगव्हान, सुरज बरडे पारडी, अनवर शहा वरुड, कमलेश हरले वरुड, संजय पांडल वरुड, मीराबाई आगरकर लोणी, विजय वाघमारे, यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याकरिता परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी केली आहे .

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा खर्च राज्य शासन करणार – आमदार देवेंद्र भुयार
बस अपघातामध्ये काही प्रवाशांना आपला पाय, हात, गमवावा लागला असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मी स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून बस अपघातातील झाखमी झालेल्या सर्व रुग्णांचे उपचार खासगी रुग्णालयामध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या रुग्णाला उपचारासाठी येणार सर्व खर्च परिवहन मंडळाकडे सादर करावा लगेच सर्व बिलांचा परतावा देण्यात येईल असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देण्यात आले त्यामुळे सर्व रुग्णांना उपचारासाठी लागणारा सर्व खर्च राज्य शासन करणार असल्यामुळे जेथे रुग्ण भरती झाले असेल त्यांनी वरुड आगार व्यवस्थापक व प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधावा – आमदार देवेंद्र भुयार