• Tue. Sep 19th, 2023

प्रेमळ विश्व

ByGaurav Prakashan

Jan 30, 2021
    दाटूनी आले आभाळ
    मन आठवणीत गेले
    डोळ्यातून सरसर
    पार ओघळू लागले..
    होती विश्वासाची कुशी
    नाही त्याला कसली तोड
    धुंद त्या गोड आठवणी
    त्यांना आसवांची जोड..
    सोन्यासारख्या माणसांनी
    सदा भरलेली मातीची घरे
    अंगणातही मैफिल चालेThank you for reading this post, don't forget to subscribe!
      आनंदीत असत साऱ्यांची चेहरे..
      लहानांसोबत मोठी माणसेही
      मनमोकळी हसत नि खेळत
      नव्हता कसला मोठेपणा नि स्टेटस
      बेधुंदपणे रोज ती जगत असत..
      गेले ते दिवस बालपणीचे
      राहिल्या आठवणी सुखाच्या
      गुंतूनी त्या प्रेमळ विश्वात
      डोळ्यांत आसवे समृद्धीच्या..
      सौ.कोमल शिंदे,
      धुळे.