मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जानेवारी २0२१ मध्ये बाळाला जन्म देणार आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नेंसीदरम्यानचे फोटोदेखाल शेअर करताना दिसली आहे. आता तिने व्होग मॅगझिनसाठी अनुष्का शर्माने कव्हर फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर अनुष्काने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट केला आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोशूटमध्ये अनुष्काच्या चेहर्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत असून यावर विराट कोहलीची प्रतिक्रियादेखील येत आहे.
अनुष्काचा पती विराटने अनुष्काचे भरभरून कौतुक केले आहे. त्याने कमेंट करताना लिहिले आहे, खुपचं सुंदर. कव्हर पेज शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले आहे, आपल्यासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी हे कॅप्चर केले.
या फोटोशूटदरम्यान अनुष्काने प्रेग्नेंसी विषयी म्हटले की, मी चित्रपट बुलबुलच्या प्रमोशनमध्ये बिझी होते आणि झूमकॉलवेळी मला अचानक समस्या झाली. मला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर मी तत्काळ आपला व्हिडिओ ऑफ केला होता.
आणि आपला भाऊ कर्णेश शर्माला मेसेज केला होता. त्यावेळी तोदेखील कॉलवर होता. जर मी सेट किंवा स्टुडिओमध्ये असते, सर्वांना समजले असते.
प्रेग्नेंट अनुष्का शर्मांचे खास फोटोशूट
Contents hide