• Tue. Sep 26th, 2023

प्रवासातील तणावावर मात

ByGaurav Prakashan

Jan 22, 2021

आजकाल शहरांमधल्या वाहतूक कोंडीतून वाट काढत इच्छित स्थळी पोहोचण्याची कसरत अत्यंत वैतागवाणी असते. कार्यालयीन वेळ गाठण्याच्या धांदलीत रस्त्यात अनेकांशी वाद झाल्याने खूप ताण येतो. प्रवासादरम्यानच्या या ताणामुळे भविष्यात अनेक विकार जडू शकतात. म्हणूनच दैनंदिन प्रवासातला तणाव दूर ठेवण्यासाठी उपाययोजना करायला हव्या. त्याविषयी जाणून घेऊ..
* शक्य असेल तेव्हा वाहतूक कोंडीच्या वेळा टाळून प्रवास करा. स्वत:च्या वाहनाने प्रवास करणार्‍यांनी शक्यतो लवकर निघावे. त्यातही वेळेत पोहोचणे आवश्यक असताना हा पर्याय निवडला तर ताणाचे प्रमाण कमी होते.
* प्रवासात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे टाळा. वाहन चालवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.
* उर्मट, अरेरावी करणार्‍या चालकांच्या नादाला लागू नका. कोणत्याही वादात अडकणे टाळा. आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!